साप्ताहिक राशिभविष्य – ७ ते १४ फेब्रुवारी
मेष – नूतन वास्तू खरेदी चर्चा. कायदेशीर प्रकरणांमध्ये गती. आरोग्यविषयक खर्चामध्ये थोडी वाढ. मूल्यवान वस्तू खरेदी.
वृषभ- धार्मिक समारंभाची तयारी. परिषदांच्या भेटीगाठी. तरुण मंडळींची संबंधित प्रश्न सुटतील. शुभवार्ता कळतील.
मिथुन- स्पर्धा परीक्षांमध्ये यश. वारसा हक्काच्या प्रश्नांमध्ये गती. गुंतवणुकीचा फायदा. उपयोगी माणसांचा सहवास.
कर्क- नोकरीत वरिष्ठांशी गैरसमज सांभाळा. किरकोळ गोष्टींवरून कौटुंबिक वाद नको. आर्थिक नियोजन करताना तारेवरची कसरत. नवीन फर्निचरची खरेदी नियोजन.
सिंह- व्यवसाय प्रगतीच्या घटना. लांबचा प्रवास टाळा. महत्वाची कागदपत्रे सांभाळा. घरातील लहानग्यांच्या आरोग्याच्या कुरबुरी.
कन्या- परदेशगमन योग. शैक्षणिक भरभराट. वाट बघत असलेली चांगली बातमी मिळेल. पोटदुखीचा त्रास सांभाळा.
तूळ – व्यवसायातील ऍक्टिव्हिटीमुळे भरगच्च सप्ताह. परिचितांचे येणे-जाणे राहील. शब्द सांभाळून वापरा. फायद्याच्या मंडळींनाच वेळ द्या.
वृश्चिक- वेगवान शुभ घडामोडी. घरातील तरुणाईचे विवाह योग. मोठी सरकारी कामे मार्गी लागतील. मनासारखे नोकरीच्या संधी. बाहेर काळजीपूर्वक पाणी प्या.
धनु- नोकरदारांना चांगले पॅकेज मिळेल. व्यावसायिकांचा व्यवसाय वाढीमुळे उत्साह. निसर्ग सहलींचे आयोजन. कर्जमंजुरी होईल.
मकर – आपली मध्यस्थी फायद्याची राहील. घरातील ज्येष्ठांकडे दुर्लक्ष नको. घरातील कुरबुरी टाळाव्यात. नोकरदारांना सुवार्ता मिळेल.
कुंभ – मानसन्मान मिळेल. प्रिय व्यक्तींचे गैरसमज दूर होतील. आर्थिक व मानसिक संमिश्र वातावरण. नोकरीत अपेक्षित बढती.
मीन- मौल्यवान वस्तू सांभाळा. कायदेशीर प्रकरणे निकाली निघतील. व्यवसायिकांनी स्पर्धकांपेक्षा अधिक गुणवत्ता राखावी.
……
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.