साप्ताहिक राशिभविष्य – ६ ते १३ डिसेंबर २०२०
मेष- आप्त स्वकीयांचे बोल ऐकून घ्यावे लागतील. मागील कौटुंबिक वाद वाढू देऊ नये. वाद व हटवाद यातील सीमारेषा ठरवावी लागेल. आपण भले आपले काम भले नीती अवलंबणे फायद्याचे..
वृषभ- महत्त्वाच्या प्रसंगी मदत होईल. आर्थिक गणित ताळ्यावर येईल. अंदाजाप्रमाणे व्यवसायिक उलाढाल होईल. आळसावर नियंत्रण हवे. पाहुण्यांची सरबराई होईल.
मिथुन- वाहनाचा मेंटेनन्स ची डोकेदुखी होण्याची शक्यता. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा. मौल्यवान वस्तू सांभाळा. व्यावसाईक अंदाज ना नफा ना तोटा असे राहतील.
कर्क- दिवाणी व्यवहारातून तान तनाव शक्यता. पूर्वांपार मालमत्तेबाबत साधक-बाधक चर्चा ची शक्यता. स्पष्ट बोलणे पेक्षा योग्य ते बोलण्याचा फायदा होईल.
सिंह- मोठ्या व गुंतागुंतीच्या प्लॅनिंगमध्ये पुढाकार होईल. एकाच वेळी अनेक काम निघाल्याने अर्जंट व इम्पॉर्टंट परत करा. घरातील छोट्या-मोठ्या गोष्टी दुर्लक्ष होण्याची शक्यता. एकाच वेळी अनेक जणांना सहकार्य झाल्याने सामूहिक सहानुभूती मिळेल.
कन्या- संपर्कातील प्रत्येकावर योग्य तो विश्वास दाखवून कामे साधून घ्या. खोचक टीकाटिपणी करू नये. अर्धशिशीचा त्रास संभवतो. गुंतवणुकीचा परतावा उशिरा मिळू शकतो त्यातून मानसिक ताण तणाव सांभाळा.
तूळ- उपयोगाचा व बीन उपयोगाचा व्यक्ती ओळखण्याचे कसब वाढवा. भावनिक गोष्टींवर अधिक वेळ खर्च करणे नको. खाण्या-पिण्याच्या गोष्टींमुळे आर्थिक गणित सांभाळणे अवघड होईल.
वृश्चिक- कल्पना शक्तीपेक्षा कृतिशीलता वाढवा. क्या करे क्या ना करे यातून पटकन बाहेर या. परिस्थितीला अनुकूल करून घ्या अथवा व्हा.
धनू- मोठा धार्मिक कार्याचे प्लॅनिंग. ज्येष्ठांचे आरोग्य सांभाळा. पित्ताचा त्रास बळावेल. आप्तस्वकीयांनीकडून मनासारखे वागणे झाल्याने वातावरण आनंदी राहील.
मकर- वादविवाद टाळा. आपल्या दैनंदिन बाहेरील कामावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करा. अर्धवट धार्मिक कार्य महिनाअखेर पूर्ण करून घ्या. कुटुंबातील सदस्यांची गरजेपेक्षा अधिक चिंता नको.
कुंभ- आर्थिक संचयचा फायदा होईल. वाहन सौख्य मिळेल. मित्र परिवाराला आपल्या सल्ल्याचा फायदा होईल. जुनी अडकलेली कामे मार्गी लागतील.
मीन- ज्ञानसंग्रह सप्ताह असे म्हणता येईल. अधिकाधिक व्यवसायिक ज्ञान मिळवण्याकडे लक्ष ठेवा. परिपूर्णतेचा पाठपुरावा करा. यातून तब्येतीकडे दुर्लक्ष नको….
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे..
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.