साप्ताहिक राशिभविष्य – ४ ते ११ एप्रिल २०२१
१) मेष – वेळेचा पुरेपूर वापर करा. योग्य आर्थिक नियोजन आवश्यक. उसनवार सांभाळा. व्यवसायिक यशासाठी अधिक परिश्रम गरजेचे.
२) वृषभ – अडचणींवर संयमाने मात करा. मित्रमंडळींकडून योग्य ते सहकार्य मिळेल. अनावश्यक खर्च टाळा. सर्व प्रकारची गुंतवणूक सांभाळून करा.
३) मिथुन – अधिक कार्यक्षम व्हावे लागेल. गोड बोलून कार्यभाग साधा. अनपेक्षित शुभवार्ता. सार्वजनिक कामात यश मिळेल.
४) कर्क – गुप्त शत्रूंवर लक्ष ठेवा. वरिष्ठांचे मार्गदर्शन गरजेचे. स्वयंशिस्त आवश्यक. व्यक्तिगत देवाण-घेवाण सांभाळा.
५) सिंह – आर्थिक इच्छापूर्ती होईल. सोपवलेली जबाबदारी यशस्वी पार पाडाल. वेळेचे योग्य नियोजन गरजेचे. ध्येयाबाबत चलबिचल नको.
६) कन्या – कौटुंबिक सौख्य राहील. सल्ला जरा जपूनच द्या. सुरक्षित गुंतवणूक ठेवा. प्रवास संभवतो. स्वतःला सिद्ध करण्याची संधी.
७) तुळ – रागावर नियंत्रण ठेवा. तोल मोल के बोल. मेहनतीला योग्य यश मिळेल. परिचितांशी चांगले संबंध ठेवा.
८) वृश्चिक – गरजेपेक्षा अधिक मेहनत टाळा. महत्वाची कागदपत्रे सांभाळा. आहार-विहाराकडे लक्ष द्या. खिलाडूवृत्तीने टीका स्वीकारा.
९) धनु – मानसिक स्वास्थ्य सांभाळा. वात, प्रकोप काळजी घ्या. अति व्यावहारिक दृष्टिकोन नको. सर्वच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतील, अशी अपेक्षा नको.
१०) मकर – उत्तम श्रोते बना. टीका टाळा. आतापर्यंत केलेल्या मेहनतीचे योग्य श्रेय मिळेल. कौटुंबिक सुसंवाद ठेवा.
११) कुंभ – ऐकीव बाबींवर गैरसमज नको. धारदार बोलण्यापेक्षा सौम्य शब्दात काम साधा. विश्वासू व्यक्तीवर आर्थिक दारोमदार ठेवा.
१२) मीन – आर्थिक, मानसिक, शारीरिक स्वास्थ्य. त्रिकोण सांभाळा. अनावश्यक खर्च टाळा. अर्जंट व इम्पॉर्टंट कामे त्यात फरक करा.
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे…