साप्ताहिक राशिभविष्य – ३ ते १० जानेवारी २०२१
मेष – आपण केलेले अंदाज बहुतांशी बरोबर येतील. आर्थिक बाजू भक्कम राहिल. शॉर्ट इन्वेस्टमेंट टाळा. गुंतागुंतीच्या ठिकाणी तुमचे म्हणणे शांत व स्थिर चित्ताने मांडा.
वृषभ – नोकरी व्यवसाय अंतर्गत सुप्त विरोधक यांच्यावर नजर ठेवा. निकोप स्पर्धा राहील असे बघा. खिलाडूवृत्तीने वागा. पोटदुखी कडे दुर्लक्ष करू नका.
मिथुन – थोडे आत्मपरिक्षण करा. मेहनतीने यश मिळेल. गुंतागुंतीच्या परिस्थितीत त्रागा न करता शांतपणे निर्णय घ्या. आर्थिक आघाडी दोलायमान राहील.
कर्क – अनपेक्षित आव्हान समोर येईल. फक्त आश्वासनांवर अवलंबून राहू नये. आपला आवाका बघून निर्णय घ्यावा. कंफर्ट झोन मधून बाहेर यावे. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे.
सिंह – थेट कटू बोलणे टाळावे. योग्य तिथे मौन ठेवून काम साधावे. व्यवहारात आपला, परका ओळखण्यात गल्लत करू नये. आर्थिक वाईट अनुभव येऊ नये याची काळजी घ्यावी.
कन्या – आर्थिक परिस्थितीचा योग्य अंदाज घेऊन पुढील आर्थिक निर्णय घ्यावे. मागील सकारात्मक अनुभवानुसार पुढे गोष्टी घडतील असे मानू नये. कुटुंबातील सदस्य त्यांच्याशी सुसंवाद ठेवावा. शारीरिक व्याधींसाठी आर्थिक तरतूद करून ठेवावी. विरोधकांना कमी लेखू नये.
तूळ – आपले खरे हितचिंतक कोण याचा अचूक अंदाज घ्यावा. लांबचे प्रवास टाळावे. मेहनतीचे आर्थिक चीज होईल. बौद्धिक शक्ती फायद्याच्या ठिकाणी खर्च करा. कुणाला गृहीत धरू नका.
वृश्चिक – व्यवसाय प्रगतीसाठी त्वरित पावले उचला. अनुभवी व्यक्तींना सल्ला विचारा. नेहमीच्या नकारात्मक गोष्टींना थारा देऊ नका. आपल्यामध्ये असलेल्या आर्थिक व्यक्तिमत्व विकसित करा.
धनु – संधी शोधा व ती साधा. मदतीसाठी कुणावर फारसे अवलंबून राहू नका. अर्थव्यवहार सांभाळून करा. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी वरिष्ठांचा गैरसमज सांभाळा.
मकर – तोल मोल के बोल. माहित नसलेल्या विषयाबाबत सल्ला देऊ नये. आधी न केलेल्या गोष्टींबाबत सावध पवित्रा असावा. एकदम नवीन क्षेत्रात गुंतवणूक टाळावी.
कुंभ – वरिष्ठांशी सोबत मतभेद टाळा. आपल्या बाजूने वादाला सुरुवात होणार नाही याची काळजी घ्या. बाहेरील खाद्यपदार्थ टाळा
मीन – एकावेळी अनेक क्षेत्रात ज्ञान घेताना त्या क्षेत्राच्या मर्यादा लक्षात ठेवा. खर्चावर प्रयत्नपूर्वक नियंत्रण ठेवा. सहकाऱ्यांकडून मदत घेताना आपला, परका जाणा. मतभेदाचे रुपांतर भांडणात होऊ देऊ नका.
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.