साप्ताहिक राशिभविष्य – ३१ जानेवारी ते ७ फेब्रुवारी
मेष – व्यवसायिक अंदाज बऱ्यापैकी खरे ठरतील. आर्थिक प्लॅनिंग व्यवस्थित करावे लागेल. कौटुंबिक आरोग्य सांभाळा. लांबचा प्रवास दिवसा करा.
वृषभ – शब्द हेच सामर्थ्य आहे. नेतृत्वगुण अधिक प्रगल्भ करा. कफाचा त्रास संभवतो. परिचीतांची मदत होईल. रिस्क प्लॅनींग विचारपूर्वक करा.
मिथुन- योग्य व्यक्तीकडे भावना व्यक्त करा. नोकरीच्या ठिकाणी सोयीस्कर मौन फायद्याचे. जबाबदारीचे वाटप करा. अनपेक्षित खरेदी संभवते.
कर्क- एकदम मर्मावर बोट ठेवण्यापेक्षा शुगर कोटेड बोला. पित्ताचा त्रास संभवतो. नातेवाइकांमध्ये जुना वाद टाळावा. आर्थिक टार्गेटसाठी तारेवरची कसरत.
सिंह- गुप्त शत्रूंवर लक्ष ठेवा. व्यवसायिक स्पर्धा अनपेक्षितरीत्या वाढेल. कुटुंबातील छोट्यांचे आरोग्य सांभाळा.
कन्या- वाहत्या गंगेत हात धुणे चुकीचे होईल. संधी प्रलोभन रूपात येऊ शकते. छोटी गुंतवणूक फायद्याची. महत्वाची कागदपत्रे सांभाळा.
तूळ- पाहुण्यांच्या आगत स्वागताने मानसिक थकवा. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचा गैरसमज सांभाळावा. तज्ज्ञ व्यक्तींचा सहवास डोळ्यांची काळजी घ्या.
वृश्चिक- प्राप्त झालेली संधी साधणे महत्त्वाचे. वैचारिक गोंधळ उडू देऊ नये. काटकसरीचा फायदा होईल. समाधानाचा स्तर ठरवावा.
धनु- धार्मिक कार्य पार पडेल. सुवार्ता मिळेल. स्थावर मालमत्ता व्यवहार होईल. मौल्यवान वस्तू सांभाळा.
मकर- जनसंपर्काचा फायदा होईल. भागीदारीत वाईट अनुभव येऊ शकतो. मानसन्मान मिळेल. महत्त्वाच्या कामांना वेग येईल.
कुंभ- परदेशगमन योग. अनपेक्षित खर्च. थांबलेले आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. शैक्षणिक भाग्योदय.
मीन- कायदेशीर व्यवहार पूर्ण होतील. आरोग्यविषयक किरकोळ कटकटी. चैनीच्या वस्तूंवर मोठा खर्च. स्पेशालिटी ज्ञानासाठी वेळ द्या.
आजचा राहू काळ
सायंकाळी साडेचार ते सहा आहे
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.