साप्ताहिक राशिभविष्य – २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२०
मेष- या सप्ताहात आपल्या आवडी निवडी इतरांशी जुळवून घेण्याची सर्कस करावी लागेल. स्वभाव ही अडचण होऊ नये याची काळजी घ्यावी. महत्त्वाची सुवार्ता मिळेल. जुन्या गुंतवणुकीचा फायदा होईल..
वृषभ- अनेक वेळा प्रवास घडल्याने तब्येतीची किरकोळ कुरकुर राहील. नवीन मेनू चाखता येतील. ज्येष्ठांची दुखणी सांभाळा. पाहुण्यांची सरबराई राहील. मिश्र भावनांचा सप्ताह..
मिथुन- खर्च सांभाळताना तारेवरची कसरत. मोठी आर्थिक अंदाज संभाळून करणे. कपड्यांची खरेदी. वाहन खरेदीचा योग. महत्त्वाचे सल्ले योग्य ठरतील. डोळ्याच्या दुखण्याकडे दुर्लक्ष नको..
कर्क- शुभ घटनांचा सप्ताह. शुभ कार्य मार्गी लागतील. व्यवसायात नवीन संकल्पना राबवता येतील. अनुभवी सल्लागारांचा उपयोग करून घ्या..
सिंह- अनपेक्षित वाद संभवतात. किरकोळ गोष्टींवर प्रतिक्रिया देणे टाळावे. सकारात्मक पद्धतीने परीचीतयांमध्ये मतप्रदर्शन करावे. नोकरीत बढतीची संधी..
कन्या- विचारल्याशिवाय सल्ला देऊ नये. विरोधक डोकं वर काढतील. गुडघे तसेच पायाचे दुखणे सांभाळा. वाहन सांभाळा. अनपेक्षित मौल्यवान भेटवस्तू मिळतील..
तूळ- अनावश्यक जनसंपर्क त्यामुळे भावनिक कुचंबणा टाळा. खर्चात काटकसर यासोबतच उत्पन्नाचे नवीन मार्ग शोधा. खूप चांगले वागण्या सोबतच व्यवहारी रहा. वसुलीचा मानसिक त्रास..
वृश्चिक- शब्द सांभाळून द्या. SOFT शब्दांचा वापर करा. FOODS व्यवसायात नवीन संधी. गुंतवणूक विस्तार संधी. जनसंपर्क वाढवताना अधिक सूक्ष्म अवलोकन गरजेचे..
धनु- उसनवार पैसे देणे टाळा. परिचितांकडून मानसिक त्रास. अपत्यांकडून शुभवार्ता. दिवाणी दावे मार्गी लागतील. अनपेक्षित खर्च करताना भावी फायद्याचा विचार व्हावा..
मकर- बढतीची संधी. व्यवसाय विस्तार करावा. फायदा आधी नुकसानीचा विचार करून गणित मांडावे. पाठदुखीचा त्रास
मकर- बढतीची संधी. व्यवसाय विस्तार करावा. फायदा आधी नुकसानीचा विचार करून गणित मांडावे. पाठदुखीचा त्रास ….
कुंभ- सहनशक्तीचा कस लागेल. पॉझिटिव्ह रिएक्शन चा फायदा होईल. गैरसमज होणार नाही याची काळजी घ्यावी. मोठी गुंतवणूक टाळा..
मीन- वेट अँड वॉच सप्ताह. व्यवसाय जैसे थे स्थिती राहील. परिचितांच्या वागण्यावर क्या करे क्या ना करे यातून मागील अनुभवावरून मार्ग काढावा. धार्मिक कार्य दानधर्म होईल.
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.