साप्ताहिक राशिभविष्य – २८ मार्च ते ४ एप्रिल
मेष – आर्थिक निर्णय घाईने नको. वात प्रकृतीची काळजी घ्या. जुने वाद टाळा. सहकार्यांशी जुळवून घ्या.
वृषभ- बिघडलेले संबंध पूर्ववत होतील. शैक्षणिक अडथळा दूर होईल. व्यवसायाला नवीन संधी मिळेल. मनाला लागेल असे बोलणे टाळा.
मिथुन- अर्थविषयक कामे सांभाळून करा. जुनी सरकारी प्रकरणे डोकं वर काढतील. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. काळजी करू नका पण काळजी घ्या.
कर्क- सर्वसमावेशक निर्णय घ्या. आर्थिक मेळ बसवताना तारेवरची कसरत. पित्त प्रवृत्ती सांभाळा. अभ्यासू वृत्तीने व्यवसायिक निर्णय घ्या.
सिंह- मनासारखे पुस्तक वाचण्यात येईल. आप्तेष्टांमधील वाद सामोपचाराने मिटवावे. दिवाणी दावे काळजीपूर्वक हाताळा. घर सजावटीत वेळ जाईल.
कन्या- अनोळखी व्यक्तीशी मोठा आर्थिक व्यवहार नको. आर्थिक फायद्यासाठी शॉर्टकट नको. ज्येष्ठांचा सल्ला फायद्याचा. छंद जोपासाल.
तूळ- परिचित यांचे व्यवसायिक सहकार्य लाभेल. जुन्या प्रयत्नांना यश येईल. फार दगदग करू नये. सार्वजनिक कामात कृतिशील सहभाग लाभेल.
वृश्चिक- वाद टाळा. स्पष्ट बोलून कटुता घेण्यापेक्षा स्वीकारभाव ठेवा. मौल्यवान वस्तू सांभाळा. आपल्या मेनूचे कौतुक होईल.
धनु- मध्यम मार्ग स्वीकारा. वरिष्ठांशी वाद टाळा. कौटुंबिक सहल संभवते. उन्हापासून काळजी घ्या.
मकर- सर्वानुमते निर्णय घ्या. आत्मविश्वास ठेवा. इतरांकडून अपेक्षा ठेवू नका. पाठदुखी सांभाळा.
कुंभ- मोठे आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. शुभ कार्य ठरेल. व्यावसायिक प्रयत्नांना यश येईल. जुनी येणी येतील.
मीन- ठरवलेल्या टार्गेटवर काम करा. प्राणायाम करा. एकाग्रता वाढवा. आर्थिक हिशोब व्यवस्थित ठेवा.
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे……