साप्ताहिक राशिभविष्य – २८ फेब्रुवारी ते ७ मार्च
मेष – स्वतःला शांत ठेवा. समोरच्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्या. वाद होण्याआधीच त्याचे निराकरण करा. कौटुंबिक गेट-टुगेदर होईल.
वृषभ – ज्येष्ठांची तब्येत सांभाळा. व्यवसायात अपेक्षित अर्थलाभ. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये. आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घ्या.
मिथुन – वरिष्ठ सहकारी त्यांना नाराज करू नका. कौटुंबिक साथ मिळेल. आर्थिक ताळमेळ बसवताना तारेवरची कसरत येईल.
कर्क – प्रियजनांचा सहवास लाभेल. सरकारी नियमांचे काटेकोर पालन करा. मौल्यवान कागदपत्रे सांभाळा. मोठा आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करा.
सिंह – हित शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवा. प्रतिस्पर्ध्याला कोणतीही संधी देऊ नये. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार ठेवा. पित्ताचा त्रास सांभाळा.
कन्या – मित्रमंडळींचे स्नेहसंमेलन होईल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. दूरचा प्रवास टाळा. पैसे मिळवण्याचा शॉर्टकट मार्ग नको.
तूळ – आपण भले आपले काम भले ठेवा. फायदा नसणाऱ्या संकल्पनांवर वेळ घालू नये. आहार-विहार सांभाळावा. खर्च नियंत्रणात ठेवा.
वृश्चिक – व्यवसायाच्या नवीन संकल्पना सुचतील. कौटुंबिक धुसफूस सांभाळा. वाद वाढू देऊ नये. मोठा आर्थिक व्यवहार तज्ञांच्या सल्ल्याने करावा.
धनु – प्रगतीशील सप्ताह. आर्थिक परिस्थितीत सकारात्मक बदल होतील. कला क्षेत्रातील मंडळींना नवनवे प्रयोग करायची संधी. सहकाऱ्यांच्या मदतीने लाभ होईल.
मकर – निराशावादी विचार नको. कार्यमग्न रहा. आपल्या मेहनतीची दखल घेतली जाईल. वरिष्ठांची शाबासकी मिळेल. परिश्रमाचे चीज झाल्याची अनुभूती होईल.
कुंभ – सामाजिक क्षेत्रात तोल मोल के बोल. बौद्धिक क्षमतेच्या आधारावर यशप्राप्ती. अनपेक्षित खर्च सांभाळा. मानसिक ओढाताण जाणवेल.
मीन – व्यवसाय नवीन संकल्पनांवर काम सुरू करा. सहकाऱ्यांची मते विचारात घ्या. व्यवसायिक गुंतवणूक करताना पूर्ण विचारांती करा. तत्काळ मतप्रदर्शन नको.
…….
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे..