साप्ताहिक राशिभविष्य – २४ ते ३१ जानेवारी २०२१
मेष – अनुकूल घटना घडतील. छोटे प्रवास संभवतात. लहानसहान मतभेद होणार नाही याची काळजी घ्या. वडिलोपार्जित प्रकरणे मार्गी लागतील.
वृषभ- अधिक प्रमाणात ध्येयपूर्ती होईल. कौटुंबिक संबंध जपावे. मध्यम मुदतीच्या गुंतवणुकीत फायदा. पोटासंबंधी तक्रारीकडे दुर्लक्ष नको. मानसिक दृष्ट्या प्रसन्नता ठेवावी.
मिथुन- स्वतःच्या प्रगतीचा मार्ग तयार कराल. धार्मिक कार्यात सहभाग. घाईगडबडीत गुंतवणूक नको. अति आत्मविश्वासाने जबाबदारी घेऊ नये.
कर्क- कौटुंबिक गैरसमज टाळावेत. माता-पित्याकडून आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करावा लागेल. उत्पन्नाचे अधिक मार्ग शोधून ठेवा. सकारात्मक विचारांची गरज.
सिंह- कामे पूर्णत्वास नेण्यास उत्तम सप्ताह. फायदा-तोटा याचा विचार न करता परिचितांना मदत होईल. आवेशात जबाबदारी घेऊ नये. जुनी येणी येतील. आरोग्य उत्तम राहिल.
कन्या- धैर्याने परिस्थितीचा सामना कराल. योग्य वेळी परिचितांची मदत होईल. दीर्घकालीन व्यवसायिक विचार करावा. फायद्याचे करार मदार होतील.
तूळ- बोलण्याआधीच विचार करा. व्यवसाय हेतूने प्रवास. कार्यक्षेत्रात आर्थिक लाभ. वरिष्ठांकडून प्रशंसा. महत्त्वाच्या व्यक्तीची फार काळ नाराजी दीर्घकालीन तोट्याची. तार्किक प्रगल्भता दीर्घकालीन फायद्याची.
वृश्चिक- मानसिक तब्येत नरम-गरम राहिल. स्वतःचं भावनिक अस्तित्व ठेवून राहावे. अंगभूत कलागुणांना योग्य वाव द्यावा. ताणतणाव व्यवस्थापन गरजेचे.
धनु- जोडीदारास वेळ द्या. खास मान सन्मान मिळेल. छोट्या सहलींचे आयोजन. कार्यक्षेत्रात इतरांवर अवलंबून राहू नका. विनाकारण धावपळ टाळा.
मकर- तब्येतीसाठी नरम-गरम काळ. नोकरदारांनी नोकरीच्या ठिकाणी परिस्थितीचा अंदाज घेऊन बोलणे ठेवावे. मोठ्या निर्णयाचा सर्वांगाने विचार व्हावा. जोडीदाराची तब्येत सांभाळावी.
कुंभ- महत्वाची कागदपत्रे सांभाळा. जुन्या सहकाऱ्यांची मदत होईल. रात्रीचा प्रवास टाळा. खाण्यापिण्याची काळजी घेणे. धार्मिक कार्य संभवतात.
मीन- भावनिक खंबीर बनणे गरजेचे. कार्यक्षेत्र व शैक्षणिक अभ्यास याचे टाईम टेबल सांभाळावे. या सप्ताहात मोठ्या आर्थिक उलाढाली करू नये.
आजचा राहू काळ
सायंकाळी साडेचार ते सहा आहे

ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.








