साप्ताहिक राशिभविष्य – २१ ते २८ फेब्रुवारी
मेष – कामकाजात बारकावे शोधा. नव्या जबाबदाऱ्या येतील. तोंडी आर्थिक व्यवहार टाळा. आर्थिक नियोजनास प्राधान्य द्या.
वृषभ – आप्तेष्टांकडून कौतुक होईल. आर्थिक चढ-उतार शारीरिक व्याधी सांभाळा. करारमदार करताना काळजी घ्या.
मिथुन – प्रतिकूल प्रसंग सांभाळा. जवळच्यांकडून कटू अनुभव येण्याची शक्यता. व्यवहारिक पातळीवर सकारात्मक घडामोडी. रखडलेली कामे मार्गी लागतील.
कर्क – उसने पैसे देणे टाळा. कौटुंबिक जबाबदार्या वाढतील. एखादा धाडसी निर्णय घ्यावा लागेल. प्रवास सांभाळून करा.
सिंह – नको त्या प्रकरणात मध्यस्थी टाळा. प्रसंगावधान आवश्यक. जुनी इच्छापूर्ती होईल. जबाबदारीचे भान ठेवा.
कन्या – छोट्या कामाला अधिक शक्ती नको. आर्थिक परिस्थिती सुधारेल. कोणत्याही घटनेने नाराज होऊ नका. कर्तव्यपूर्ती वर लक्ष ठेवा.
तूळ – दिलेला शब्द पाळण्यात अडचणी येतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. शब्द सांभाळून वापरा. नावलौकिक होईल.
वृश्चिक – जमीन जुमलाचे व्यवहार सांभाळा. कुटुंबातील नाराजीची कारणे शोधा. गैरसमज करून घेऊ नका. तडजोडीत फायदा.
धनु – आर्थिक सावधगिरी बाळगा. डोळ्यांची काळजी घ्या. प्रसंगावधान साधा. जुनी कामे मार्गी लावा.
मकर – सबुरीने घ्या. कौटुंबिक जीवनात समाधानाचे क्षण. कौटुंबिक धार्मिक कार्य पार पडेल. मध्यस्ती यशस्वी होईल.
कुंभ – पोटाचे आजार सांभाळा. आत्मविश्वास वाढेल. मोठे निर्णय चर्चा करून घ्या. आर्थिक व्यवहारात लिखापढी आवश्यक.
मीन – नोकरी व्यवसायात नव्या जबाबदाऱ्या. तब्येत सांभाळा. रोख रक्कम काळजीपूर्वक हाताळा. मूल्यवान वस्तू खरेदी.
आजचा राहू काळ
साडे चार ते सहा आहे..
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा.