साप्ताहिक राशिभविष्य – २० ते २७ डिसेंबर २०२०
मेष- या सप्ताहात मुख्यता स्वतःला शांत ठेवा. आर्थिक ताणाताण होण्याचा संभव. आधीच्या अनुभवाने अपेक्षित खर्च टाळता येऊ शकतो. सप्ताहाचा शेवट शुभवार्ता.
वृषभ- घर सजावटीच्या नवीन संकल्पना. नवीन मेनू चाखाल. कपडालत्ता ची नवीन खरेदी. कुटुंबात किरकोळ कुरबुर. फायद्याच्या अंदाज बरोबर येतील. आपल्या सल्ल्याचे महत्त्व इतरांना पटेल…
मिथुन- या सप्ताहात नशिबाची जोरदार साथ मिळेल. अडलेली कामे मार्गी लागतील. रोजच्या रहाटगाडग्या तून थोडी उसंत मिळेल. अनपेक्षित आर्थिक फायदा..
कर्क- कौटुंबिक जबाबदार्या वाढतील. कुटुंब सदस्यांवर चिड चीड नको. अनपेक्षित आर्थिक जबाबदाऱ्या वाढतील. परंतु अनपेक्षित सुखद घटनांनी सप्ताहाचा शेवट..
सिंह- फारसा संबंध नसल्यास वादात पडू नये. शैक्षणिक प्रगती. स्पर्धात्मक यशाचा सप्ताह. योग्य अयोग्य निर्णय घेताना दीर्घकालीन फायद्याचा विचार व्हावा. पथ्यपाणी सांभाळावे..
कन्या- हेड ओर टेल दोनो भी आपका कैसे होगा? सर्व घटनांमधून फार अपेक्षा बाळगू नये. निष्काम कर्मयोगी भावना ठेवावी. दुरस्थ कुटुंबीयांची चिंता सतावेल. गुंतवणुकीस अपेक्षित रिटर्न्स मिळण्याची शक्यता कमी..
तूळ- फायद्याचे तसेच तोट्याचे परीचीतान मध्ये गल्लत करू नये. वेळेची गुंतवणूक योग्य ठिकाणी करावी. भावना आणि व्यवहार यातील हेअर लाईन ओळखावी..
वृश्चिक- अनपेक्षित जबादारयामुळे मेटाकुटीस याल. सहनशक्ती ची परीक्षा बघणारा सप्ताह. हितचिंतकांच्या सहकार्याने मानसिक आधार मिळेल. हेका सोडावा..
धनु- किती सहकार्य केले तरी टोमणे मिळतील. खिलाडूवृत्तीने घेतल्यास वाद होणार नाही. मित्र परिवाराचे सहकार्य मिळेल. सप्ताहाचा शेवट मनासारखी घटना..
मकर- कामातील एकाग्रता वाढवावी. विनाकारण वाद टाळण्यातच फायदा आहे. आपले मानसिक स्वास्थ्य आपणच सांभाळा. गैरसमजातून कोणतेही मत ठरवणे घाईचे होईल..
कुंभ- पोटाच्या तक्रारी वाढतील. योगासन प्राणायाम यातील सातत्य महत्वाचे. अनावश्यक खरेदी टाळा. अनपेक्षित मोठे खर्च समोर येतील. अपत्यांना यश मिळेल..
मीन- काय करू आणि काय नको एवढ्या संधी उपलब्ध आहेत. मागील अनुभव व भविष्यकालीन लॉजिक यावर योग्य तो निर्णय घ्यावा. ज्ञानाचा पुरेपूर वापर होईल…..
—
आजचा राहू काळ
संध्याकाळी साडेचार ते सहा आहे.
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.