साप्ताहिक राशिभविष्य – १७ ते २४ जानेवारी २०२१
मेष – अवलंबून राहून कोणतेही निर्णय घेऊ नये. खास सन्मान मिळेल. किरकोळ गोष्टीवरून मतभेद टाळा. रेंगाळलेल्या वस्तूंची खरेदी होईल. सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य राहिल.
वृषभ- मानसिक तब्येत सांभाळा. जुने परिचीत भेटतील. नवीन कार्यक्षेत्रात वाव. व्यवसायात नवीन प्रयोग यशस्वी होतील. छोट्या गुंतवणुकीत फायदा.
मिथुन- एकाच वेळी अनेक कामे करणे टाळावे. ताणतणाव नियंत्रण आवश्यक. ध्यानधारणा, प्राणायाम यावर लक्ष केंद्रित करावे. आप्तेष्टांच्या मधील दुरावा कमी होईल.
कर्क- जोमाने काम करण्यास उत्तम काळ. दूरदृष्टीने विचार करून निर्णय घ्या. वरिष्ठांची मर्जी राहिल. भागीदारीच्या कामासाठी अनुकूल काळ. प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये.
सिंह- एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करा. कार्यशैलीमध्ये सकारात्मक बदल आवश्यक. अपेक्षित प्रगती होईल. किरकोळ टीका खिलाडूवृत्तीने घ्या.
कन्या- छोटे-मोठे आर्थिक त्रास संभवतात. व्यवसायात येणाऱ्या समस्यांवर विविध पर्यायांचा विचार करून ठेवा. दगदगीमुळे अशक्तपणा जाणवू शकतो. सकारात्मकता वाढवा.
तूळ- सिजनल व्यवसाय व त्यांचे पर्याय यावर अभ्यासपूर्ण कृती करा. केवळ गोड बोलणे म्हणजे प्रगल्भता नव्हे. अनुभवी व्यक्तींशी बोलताना अचूक शब्दांचा वापर करा. क्वॉलिटी कॉन्टॅक्टवर भर द्या.
वृश्चिक- आर्थिकदृष्ट्या परिस्थिती अनुकूल होण्याची वाट न बघता आहे त्या परिस्थितीशी सामोरे जा. छोटे व्यवसाय, प्लॅनिंग, आवश्यक विचार व कृती मध्ये परस्पर पूरकता व सातत्य आवश्यक.
धनु- कामाचे वेळापत्रक-प्रत्यक्ष कृती यामध्ये अधिकाधिक सांगड घाला. व्यवसायात सकारात्मक सातत्य गरजेचे. जवळच्या व्यक्तीशी वादविवाद टाळा. मोसमी दुखण्याची काळजी घ्या.
मकर- टोकाचे मतप्रदर्शन टाळा. सहकाऱ्यांच्या साथीने लक्ष पार पडेल. गैरसमज झालेल्यांशी पुढाकार घेऊन गोडवा निर्माण करा. अस्ताव्यस्त प्लॅनिंग शिस्तबद्द करा.
कुंभ- कामाचे अभ्यासपूर्ण प्लॅनिंग करा. आर्थिक ताण-तणाव कौटुंबिक नात्यांमध्ये येऊ देऊ नये. योग्य पाठपुरावा केल्यास जुनी येणी येतील.
मीन- उत्पन्नाबरोबर खर्च अपेक्षित आहे. सोबत बचतीचा ही विचार करा. व्यावसायिकांनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी पूर्वानुभव वापरावा. अनेक पर्यायांचा यशस्वी वापर होईल. फक्त नियोजन गरजेचे.
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.