साप्ताहिक राशिभविष्य – १५ ते २२ नोव्हेंबर
मेष- या सप्ताहात मुख्यता आपले व्यवसायिक लॉजिक योग्य पद्धतीने लावावे लागेल. जुने नाराज मंडळी डोकं वर काढतील. वरिष्ठांची मर्जी सांभाळताना तारेवरची कसरत. कमिटमेंट सांभाळणे अवघड.
वृषभ- या सप्ताहात अविश्वसनीय सकारात्मक घटना घडतील. आर्थिक घडी बऱ्यापैकी सुरळीत होईल. घेणेकर यांचे रूप ओळखा. मोठ्या गुंतवणुकीची संधी. ऋणानुबंध व व्यवहार यात फरक ठेवा..
मिथुन- भावनिक कुचंबणा सप्ताह. वसुलीसाठी हरप्रकारे पाठपुरावा करावा लागेल. आपलेच दाम लावी आपल्या पाठी काम.. अशी परिस्थिती होईल. तब्येतीच्या कुरबुरी मात्र थांबतील..
कर्क- स्वभाव व शब्द नियंत्रणात असू द्या. अनपेक्षित मोठा वाद संभवतो. मौनम् सर्वार्थ साधते. पोटाच्या तक्रारी कडे दुर्लक्ष नको. सर्वच बाबतीत मागील अनुभवाचा वापर करून निर्णय घ्या..
सिंह- स्पर्धकांना कृतीने उत्तर द्या. रेंज ओळखून संवाद साधा. व्यवसायिक गुपिते सांभाळा. दिवाणी मॅटर्स काळजीपूर्वक हाताळा..
कन्या- मोलाचा सल्ला मोलाच्या व्यक्तिंना द्या. भावनिक अपेक्षाभंग यामुळे मानसिक त्रास संभवतो. शॉर्ट टर्म फायद्यासाठी गुंतवणूक नको. अनपेक्षित मोठा प्रवास. पिण्याच्या पाण्याची काळजी घ्यावी..
तूळ- स्वकेंद्रित विचार प्रणाली तोट्याची. चिकाटी ला गुरु मानून उत्पन्नाचे मार्ग वाढवावे. स्वतःच्या कलागुणांनी विकास साधावा. पित्ताचा त्रास संभाळा..
वृश्चिक- संशोधक वृत्तीचा फायदा होईल. स्वतःला शांत ठेवण्याच्या कलेचा पुरेपूर वापर करा. अनुभवी सल्लागारांचा आदर करा. हाडासंबंधातील दुखणे खर्चिक होऊ शकते. ढवळाढवळ करणाऱ्या मंडळींना थोडे स्पष्ट शब्दात जाणीव देणे..
धनु- आपण मदत केलेली मंडळी आपणास डोईजड होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांकडून शुभवार्ता. अनपेक्षित धनलाभ. मोठी नवीन खरेदी..
मकर- पेरल्या पेक्षा जास्त चांगले उगवेल. आनंदी सप्ताह. महत्त्वाची कागदपत्रे सांभाळा. नूतन वास्तू प्रवेश संभवतो.
कुंभ- आहार-विहार यात समतोल साधा. जुने दुखणे वर डोकं काढेल. प्लान मध्ये नसलेली महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आप्तस्वकीयाचे मन सांभाळताना तारेवरची कसरत होईल..
मीन- नवीन ज्ञानाच्या वाटा मोकळ्या होतील. अभ्यासू वृत्ती वाढवून यशप्राप्तीसाठी प्रयत्नपूर्वक प्लॅनिंग करावे. मित्रपरिवारात आपल्यामुळे मानापमान नाट्य रंगणार नाही ना याची काळजी घ्यावी…
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.