साप्ताहिक राशिभविष्य – १४ ते २१ फेब्रुवारी २०२१
मेष – सकारात्मक व्यवसायिक घडामोडींचा सप्ताह. गुंतवणुकीच्या चांगल्या संधी. जुने वाद काढू नये. समस्यांमधून कौशल्याने मार्ग काढावा.
वृषभ – निसर्ग भटकंती होईल. सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन. कपड्यांची खरेदी. आर्थिक देवाण-घेवाण होईल.
मिथुन – छोट्या गुंतवणुकीची संधी सोडू नये. रोख रकमेचे व्यवहार सांभाळून करा. ज्येष्ठांचे आरोग्य सांभाळा. महत्वाची कागदपत्रे सांभाळा.
कर्क – कायदेशीर कामाच्या तारखा सांभाळा. स्थावर मालमत्तेचे व्यवहार काळजीपूर्वक करा. नवनवीन मेनू चाखण्याची संधी.
सिंह – मध्यस्थीमुळे वाद उत्पन्न होणार नाही याची काळजी घ्या. शुभ कार्य होतील. नवीन वाहन खरेदी. आर्थिक व्यवहारात गैरसमज टाळा.
कन्या – योग्य व्यक्तीलाच सल्ला द्या. पित्ताचा त्रास सांभाळा. दूरस्थ नातेवाईकांशी संभाषण होईल. कौटुंबिक कलह कुशलतेने हाताळा.
तूळ – व्यवहार व नातेसंबंध यात फरक ठेवा. शब्द वापरताना सावधानता बाळगा. गुडघेदुखीचा त्रास सांभाळा. तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन लाभेल.
वृश्चिक – व्यवसायात कल्पकतेचा वापर करा. व्यवसाय वृद्धीसाठी चांगला काळ. भागीदारी व्यवसाय सांभाळून करा.
धनु – अनपेक्षित आर्थिक जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता. घरातल्या लहान मुलांची तब्येत सांभाळावी. नोकरी व्यवसायात नवीन जबाबदारी. शांत चित्ताने आव्हाने हाताळा.
मकर – नोकरदारांना एकावेळी अनेकांशी जुळवून घ्यावे लागेल. अभ्यासातील एकाग्रता उपयोगी येईल. अनपेक्षित शुभवर्तमान समजेल. कौटुंबिक वातावरण कुशलतेने हाताळावे.
कुंभ – अनपेक्षित नवीन जबाबदाऱ्या. स्थावर मालमत्ताबाबत जुन्या कागदपत्रांची गरज भासेल. मित्रपरिवार भेटेल. अनपेक्षित मोठ्या खर्चाची शक्यता.
मीन – व्यवसायिक कल्पकतेने मोठा आर्थिक लाभ मिळेल. अति व्यस्तता टाळावी. सर्व प्रकारच्या कामासाठी टाईम टेबल पाळावे. अनपेक्षित नवीन ओळखीमुळे व्यवसाय वृद्धी.
….
आजचा राहू काळ
दुपारी साडेचार ते सहा आहे.
