साप्ताहिक राशिभविष्य – १० ते १७ जानेवारी २०२१
मेष – आपण घेतलेला निर्णय यांचा पाठपुरावा करा. वादाचे विषय मुळातच चर्चेतच घेऊ नये. सोबतच्या सर्वांचे मत ऐकून घ्यावे. त्वरित तसेच टोकाचे मतप्रदर्शन टाळावे…
वृषभ – योजनेत सहभागी असणाऱ्या सर्वांना मतप्रदर्शनची संधी द्यावी. कुणालाही गृहीत धरू नये. लॉंग प्लॅनिंगवर काम कराल. ज्येष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल…
मिथुन – विचार व कृती यांचा ताळमेळ साधावा. ठासून आपले मतप्रदर्शन करण्यापेक्षा अभ्यासपूर्ण पद्धतीने करावे. मोठ्या निर्णयांसाठी वेट अँड वॉच. वाहन जपून चालवा….
कर्क – स्थावर मालमत्ता वाढीचा विचार पूर्ण अभ्यासांती करावा. आर्थिक जबाबदाऱ्या पेलण्यासाठी कुटुंबातील अन्य व्यक्तींनी सक्षम करावे. सूचना देण्यासोबतच त्या ऐकण्याची ही तयारी असावी. तब्येतीच्या किरकोळ कुरबुरी राहतील..
सिंह – कोर्ट प्रकरणे मार्गी लागतील. नोकरी व्यवसायात अनपेक्षित लाभ. ओळखीचा फायदा. गैरसमज टाळावेत. वैद्यकीय खर्चात थोडीशी वाढ….
कन्या – कौटुंबिक वातावरण हलकेफुलके राहील असे पहावे. मोठा प्रवास टाळावा. व्यवसायिक करारमदार होतील. संशयास्पद व्यवहारावर लक्ष असावे.
तूळ – व्यापक दृष्टी कोण ठेवल्यास फायदा. व्यवसायिक अधिक व्यापक विचार व्हावा. टार्गेट व्यापक करावे. परिचयातून प्रगतीच्या संधी. त्रयस्थ दृष्टिकोनाने अधिक मॅच्युरिटी साधावी..
वृश्चिक – व्यवसायिक संकल्पनांना होणारा अंतर्विरोध अभ्यासपूर्ण पद्धतीने सोडवा. जुन्या गुंतवणुकीचे लाभ होतील. मोठ्या खरेदी-विक्रीचे व्यवहार लाभात. संकल्पना सिद्धीसाठी चिकाटी आवश्यक…
धनु – धनलाभ योग. कुसंगती टाळा. मानसिक आरोग्य सांभाळा. उत्पन्न व खर्चाबाबत तारेवरची कसरत. मोठे निर्णय वेट अँड वॉच मध्ये टाका. मुलाखतीत यश.
मकर – व्यवसायिक पथ्ये गरजेची. शॉर्टकट माध्यमातून फायदा नाही. पूर्ण अनुभवांती मोठा निर्णय घ्या. खान पानावर नियंत्रण असावे. विचारपूर्वक मोठी खरेदी करा. कागदपत्रांची काळजी घ्यावी.
कुंभ – अनावश्यक जनसंपर्क टाळावा. पोटाच्या व्याधी सांभाळा. कलावंत तसेच विद्यार्थ्यांना यशप्राप्ती. कायदेशीर बाबींकडे विशेष लक्ष द्या. प्रिय व्यक्तींशी वाद टाळा.
मीन – मोठी विजयश्री मिळेल. परदेशगमन योग. कौटुंबिक पूर्ण सहकार्य. प्रतिकूल परिणामांचे व्यवहार टाळा. मौल्यवान वस्तू व कागदपत्रे जपा. समारंभातून व्यवसाय प्रगती.
……
आजचा राहू काळ
साडे चार ते सहा आहे…
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.
वरील विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://indiadarpanlive.com/?cat=22
https://indiadarpanlive.com/?cat=22