पिंपळगाव बसवंत – २०१५ साली लागू झालेला सातव्या वेतन आयोगाचा लाभ अद्याप मिळाला नसल्याने राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कर्मचा-यांनी शनिवार (दि. ७) पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाच्या वतीने देखील बेमुदत संपाचे हत्यार उगारले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष बागांसह इतर पिकांवर केल्या जाणा-या प्रयोगांना उशिर होणार आहे.
याबाबत माहिती अशी की, शासनाने २०१५ साली सातवा वेतन आयोग लागू केला. या आयोगाचा लाभ सर्वांना मिळाला. मात्र, पाच वर्षे होत आली तरी अद्याप राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील जवळपास १० ते १२ हजार अधिकारी यांना लाभ मिळाला नाही. महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचारी देखील या आयोगापासून वंचित आहे. या आयोगाचा लाभ मिळावा, यासाठी नाशिक जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचा-यांनी देखील संपात सहभाग घेतला आहे. राहुरी कृषी विद्यापीठ अंतर्गत येणा-या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, कुंदेवाडी, लखमापूरसह पिंपळगाव बसवंत येथील कांदा व द्राक्ष संशोधन केंद्रातील कर्मचार्यांनी २७ ऑक्टोबरपासून १ नोव्हेंबरपर्यंत काळ्या फिती लावून कामकाज सुरू केले. परंतु, मागणीची दखल न घेतल्याने २ नोव्हेंबरपासून ५ नोव्हेंबरपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता फक्त स्वाक्षरी करून काम बंद आंदोलन पुकारले. शुक्रवारी (दि. ६) सामूहिक रजा आंदोलन केल्यानंतर शनिवार (दि. ७) पासून मागणी मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनामुळे परिसरातील शेतक-यांचे मोठे नुकसान होणार आहे. तसेच, कांदा व द्राक्ष बागांवर केले जाणारे प्रयोग देखील थांबणार आहे.
ही कामे थांबणार
या संपामुळे शेतक-यांना बांधावर जाऊन केले जाणारे मार्गदर्शन, कांदा, टोमॅटो, द्राक्षे, डाळिंब, भात, मका, गहू, सोयाबीनसह नाशिक जिल्ह्यात घेतल्या जाणा-या पिकांवरील प्रयोग थांबणार आहे. परिणामी, शेतक-यांचे देखील नुकसान होणार आहे.

मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन
पाच वर्षे होत आली तरी अद्याप आम्हाला सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे आम्ही शनिवारपासून बेमुदत संपाचे हत्यार उगारले आहे. मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल.
– डाॅ. जितेंद्र ढेमरे, प्रभारी अधिकारी, कांदा व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत

…..
शिष्टमंडळाकडून निवेदन सादर
सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळावा यासाठी ४ नोव्हेंबर रोजी राज्यातील चारही विद्यापीठांच्या कर्मचा-यांनी महाविकास आघाडीचे प्रमुख शरद पवार, कृषीमंत्री दादा भुसे, खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. मात्र, यावेळी झालेल्या चर्चेतून कुठलीच स्पष्टता दिसून आली नसल्याने आंदोलन पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय कर्मचारी समन्वय संघातर्फे घेण्यात आला आहे.
– डाॅ. आर. बी. सोनवणे, सहाय्यक प्राध्यापक, कांदा व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत