नाशिक – त्र्यंबकरोडवरील सातपूर परिसरातील दुडगाव येथे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, दुडगाव शिवारातील रंगनाथ बेजेकर या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आज सकाळी (७ जानेवारी) बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाल्याचे दिसून आले. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्या असल्याचे शेतकरी व ग्रामस्थ सांगत होते. वासाळी, दुडगाव परिसरात त्यामुळे दहशतीचे वातावरण होते. या बुबट्याने एक बैलही ठार केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे वनविभागाने याठिकाणी पिंजरा लावला होता. अखेर या पिंजऱ्यात बिबट्या पकडला गेला आहे. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. स्थानिक पोलिस पाटलांनी वनविभागाला कळविल्यानंतर वनविभागाचे पथक येथे दाखल झाले आणि पिंजऱ्यासह या बिबट्याला नेण्यात आले आहे.
पिंजऱ्यातील बिबट्याचे हे दोन व्हिडिओ