सातपूर :- केंद्र शासनाने लागू केलेल्या शेतकरी विरोधी धोरण व कायद्याविरोधात पुकारलेल्या भारत बंदला सातपूर औद्योगिक वसाहतीतील कारखाने व अत्यावश्यक सेवा वगळता सातपूरकरांनी शंभर टक्के बंद पाळत सहभाग नोंदवला.
मंगळवारी सकाळी बहुतांश व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपापली दुकानें बंद ठेवली बंद मध्ये सहभाग नोंदवला. नेहमी वर्दळीचे ठिकाण असलेले सातपूर भाजी मार्केटमध्ये शुकशुकाट दिसून आला.
दरम्यान, सिटू संलग्न नाशिक वर्कर्सची युनियन असलेल्या विविध कारखान्यात कामगारांनी काळ्या फिती लावत तर काहींनी पहिली पाळी संपल्यानंतर प्रवेश द्वारावर निदर्शने करत बंद मध्ये सहभाग नोंदवला. भारत बंद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन बंदच्या पूर्वसंध्येला सोमवारी सायंकाळी सातपूर भारत बंद कृती समितीच्या वतीने व्यापाऱ्यांना करण्यात आले होते. सातपूर भारत बंद कृती समितीचे डॉ.डी.एल कराड ,सीताराम ठोंबरे, दौलत निगळ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिक पश्चिम अध्यक्ष नितीन निगळ,आण्णासाहेब कटारे, शशी घाटोळ, हेमंत मौले, विजय भंदुरे चेतन भंदुरे, रवी काश्मिरे ,त्र्यंबक भंदुरे, कांतीलाल भंदुरे, छगन भंदुरे, पाटील बाबा, ठोंबरे सर गोरक्ष सोनवणे, भिवानंद काळे, निलेश भंदुरे , व मच्छिंद्र भंदुरे ,रवी भंदुरे ,दीपक मौले, सुरेश गोवर्धने,सुनील निगळ, सोमनाथ मौले,विलास घाटोळ, ग्रामस्थ, पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते