सातपूर – महापालिकेने पंचवटी अमरधाममध्ये केवळ एकच डिझेलवाहिनी असल्याने मृतदेह चक्क वेटिंगवर ठेवावे लागत आहेत. सातपूरमधील तीन मृतदेहांची सद्यस्थितीत तीच असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे महापालिकेने अंत्यविधीसाठी पर्याय उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे.
कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या मृतदेहांची योग्य विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. सध्या डिझेलवाहिनीवरच काम सुरू आहे. त्यामुळे मृतदेह वेटिंगवर ठेवावे लागत असल्याची स्थिती आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोना मृतांचे प्रमाण वाढले आहे. त्याचा ताण अमरधामच्या यंत्रणेवर पडला आहे. मृतदेह दोन-दोन दिवस पडून असल्याचे दिसून येत आहे. सातपूरमधील तीन मृतदेहांचीही अशीच स्थिती आहे. त्यामुळे महापालेकिने त्वरीत अन्य पर्याय उपलब्ध करुन द्यावेत आणि मृतदेहांची हेळसांड थांबवावी, अशी मागणी होत आहे.
—
गेल्या दोन दिवसांपासून सातपूरमधील तीन मृतदेह पडून आहेत. त्यांचा अंत्यविधी कधी होणार, याची चौकशी केली असता यापूर्वीच पंचवीस मृतदेह वेटिंगवर आहेत. त्यांचे अंत्यविधी झाल्यावर सातपूरच्या मृतदेहांवर अत्यंविधी केले जातील, असे सांगण्यात आले. यामुळे नातेवाईकही खोळंबून आहेत. महापालिका प्रशासनाने त्वरीत पर्यायी व्यवस्था करावी. अन्यथा आंदोलन करावे लागेल.
– गणेश बोलकर, सामाजिक कार्यकर्ते