सातपूर – सातपूर येथील महादेव नगरच्या रहिवाशांनी कचरा कुंडी हटवण्यासाठी अनोखे आंदोलन केले. या आंदोलात त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कचरा कुडींचाच वाढदिवस साजरा केला. त्यासाठी रितसर केकही कापला.
कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. अशात या कचरा कुंडीचा प्रश्न गेली १० -१२ वर्षे होऊनही सुटत नसल्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी हे आंदोलन केले. सातपुरच्या महादेव नगर भाजीमंडई शेजारी ही कचराकुंडीच्या आहे. ती हटवावी यासाठी येथील नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देवून कचरा कुंडी हाटवण्याची मागणी वारंवार केली. या कचरा कुंडीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरते. सतत आजारी पडत असण्याचे प्रमाणही येथे वाढले असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. येथील नगरसेवकांनीही यावर तोडगा काढण्याचा प्रशासनाला आग्रह केला होता. पण, त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले.
या आदोलनात सातपुर महादेव नगरजनसेवक समितीचे पदाधिकारी विजय अहिरे , सुनील मौले, अविनाश मौले, भारत भालेराव, संजय तायडे, निखील गुंजाळ, पवन वाघ, सोनु पवार यांच्यासह स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.