नवी दिल्ली – केंद्र सरकारनं साखरेच्या निर्धारित निर्यातीसाठी ३ महिने मुदतवाढ दिली आहे. अतिरिक्त उत्पादित होणारी ६ दशलक्ष टन साखर दरवर्षी सप्टेंबर महिन्या संपणाऱ्या विपणन वर्षापर्यंत निर्यातीला परवानगी असते.
यंदा आतापर्यंत पाच पूर्णांक सात दशलक्ष टन साखरेच्या निर्यातीचे करार झाले असून, पाच पूर्णांक सहा दशलक्ष टन साखर कारखान्यांमधून रवाना झाल्याची माहिती अन्न मंत्रालयाचे सहसचिव सुबोधकुमार सिंह यांनी दिली. मात्र कोविड प्रादुर्भावामुळे काही कारखान्यांना साखरेची वाहतुक करता आलेली नाही, या कारखान्यांना साखरेची वाहतुक शक्य व्हावी, यासाठी ही मुदत डिसेंबरपर्यंत वाढवत असल्याचं, सुबोधकुमार यांनी सांगितलं.