सांगली : सांगली महापालिकेत भाजपचे सात नगरसेवक फुटल्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी हे महापौर झाले. या निवडीमुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. अवघ्या अडीच वर्षात भाजपची सत्ता उलथवण्यात राष्ट्रवादी व काँग्रेसला आघाडीला येथे यश आले आहे. भाजपच्या सात नगरसेवकांपैकी पाच जणांनी राष्ट्रवादीला मतदान केले तर दोन जण गैरहजर राहिले.
या निवडीसाठी सकाळी ११ वाजता ऑनलाइन सभा होती. त्यात ही निवड झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कॉंग्रेसकडून विश्वजीत कदम यांनी केलेल प्रयत्न यशस्वी ठरले. या निवडणुकीत भाजपकडे बहुमत असतानाही सत्ता टिकवण्यासाठी धावाधाव करावी लागली हे विशेष. भाजपच्या काही नगरसेवकात नाराजी होती. त्याचा फायदा काँगेस-राष्ट्रवादी मिळवला. या निवडणुकीत ७७ नगरसेवकांनी अॅानलाईन पध्दतीने मतदानात सहभाग घेतला. त्यात दिग्विजय सूर्यवंशी यांना ३९ तर भाजपचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांना ३६ मते मिळाली. दोन नगरसेवक गैरहजर तर एक नगरसेवक मयत आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर राज्यात पहिला मोठा धक्का महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत सांगलात देण्यात आला.