सांगली ः महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा अर्थात मोका साठी विशेष न्यायालय सांगलीत सुरू
करण्यात आले आहे. जिल्ह्यातील मोका आरोपींची सुनावणी पुणे येथे होत होती. म्हणून मुंबई उच्च
न्यायालयाने सांगलीसाठी हे मोका न्यायालय मंजूर केले होते. या न्यायालयासाठी गेली अनेक दिवस प्रयत्न
सुरू होते. सांगलीत प्रधान जिल्हा न्यायाधीश तसेच जिल्हा न्यायाधीश क्रमांक १ आणि २ आणि
इस्लामपूर इथले अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांना मोका न्यायालयाचे विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्त
करण्यात आले आहे.