नाशिक : पालकांच्या (आणि शिक्षकांच्या) मनातील अशा अनेक शंकांचे निरसन व्हावे, या उद्शाने सह्याद्री संवाद उपक्रमांतर्गत गुरुवार ७ जानेवारी रोजी शिक्षणतज्ज्ञ व टाटा ट्रस्टचे शिक्षण व्यवस्थापक किशोर दरक यांचे ‘भारताचे नवीन शैक्षणिक धोरण : पालकांच्या दृष्टीने महत्त्वाचे काय?’ या विषयावर ऑनलाइन व्याख्यान निश्चित केले आहे. सह्याद्री फार्म्सच्या कॉर्पोरेटच्या फेसबुक पेजवर या विषयावरील हे व्याख्यान फेसबुक लाईव्ह होणार आहे. या व्याख्यानाची लिंक https://www.facebook.com/
शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या जुलैत मान्यता दिली. ३४ वर्षांनंतर देशाचे शैक्षणिक धोरण बदलणार आहे. बालवाडी ते पीएचच. डी. अशा सर्व शैक्षणिक स्तरावर हे धोरण लागू होईल. या विषयावर समाजातील अनेक घटकांमध्ये चर्चा होत आहे. हे धोरण नेमके काय आहे व त्याचा आपल्या मुलांच्या शैक्षणिक भवितव्यावर काय परिणाम होणार आहे, याबाबत बहुतांश पालक अनभिज्ञ आहेत. उदाहरणार्थ, नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाचा पॅटर्न 5+3+3+4 असा असेल. दहावीच्या व बारावीच्या बोर्ड परीक्षा आता होणार नाहीत किंवा त्यांचे स्वरूप खूप बदललेले असेल.
व्याख्याते किशोर दरक शिक्षणतज्ज्ञ असून गेली वीस वर्षे शालेय शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. महाराष्ट्र व आंध्र प्रदेशातील पाठ्यपुस्तक समित्यांचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. क्वेस्ट – पालघर, प्रगत शिक्षण संस्था – सातारा, युनिसेफ – मुंबई, रूम टू रीड – नवी दिल्ली, सेंटर फॉर बजेट पॉलिसी – बेंगलुरु अशा विविध संस्थासोबत शैक्षणिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे. इकॉनॉमिक ॲण्ड पोलिटिकल वीकली, सेज जर्नल्स अकॅडेमिया आदी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये दरक यांचे शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. दरक सध्या टाटा ट्रस्टमध्ये शिक्षण व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.
—