मुंबई/नाशिक – तुळशी विवाह संपन्न होत असल्याने आता सर्वांना वेध लागले आहे ते लग्नसराईचे. यंदाच्या लग्नसराईत म्हणजेच डिसेंबर २०२० ते डिसेंबर २०२१ या काळात जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्यात अनुक्रमे गुरू व शुक्र या ग्रहांचा अस्त असल्याने लग्न मुहूर्त नाहीत. तसेच ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर या काळातही विवाह मुहूर्त नाहीत. म्हणजेच, उर्वरीत सहा महिन्यातील केवळ ४८ लग्नतिथींवरच यंदाच्या ल्गनसराईची मदार आहे.
गुरू शुक्राच्या अस्त काळामध्ये साखरपुडा, सुपारी फोडणे, लग्न निश्चित करण्याआधीचे विधी करता येऊ शकतात. परंतु लग्न हे मुहूर्ताच्या तारखांनाच करावे लागेल. आपल्याकडील वधूवरांना त्यांच्या कुंडलीतील गुरुबळ, चंद्रबळ, रवीबळ त्याचप्रमाणे एकमेकाच्या कुंडलीतील गुरु, शुक्र यांचे शुभाशुभ परिणाम पाहून योग्य तो मुहूर्त व त्या मुहूर्ताची योग्य वेळ ज्योतिषांकडे जाऊन काढून घ्यावी, असे पंडित दिनेश पंत यांनी सांगितले आहे.
यावर्षीच्या लग्नसराईतील मुहूर्ताच्या तारखा व महिने पुढीलप्रमाणे
डिसेंबर २०२०
१ डिसेंबर, ७ डिसेंबर, ८ डिसेंबर, ९ डिसेंबर, ११ डिसेंबर असे पाच मुहूर्त आहेत.
जानेवारी, फेब्रुवारी व मार्च २०२१
या तिन्ही महिन्यात अनुक्रमे गुरू व शुक्राचा अस्त असल्याने विवाह मुहूर्त नाहीत.
एप्रिल २०२१
२२ एप्रिल, २४ एप्रिल, २५ एप्रिल, २६ एप्रिल, २७ एप्रिल, २८ एप्रिल, २९ एप्रिल, ३० एप्रिल असे आठ मुहूर्त आहेत.
मे २०२१
१ मे, २ मे, ७ मे, ८ मे, ९ मे, १३ मे, १४ मे, १५ मे असे आठ मुहूर्त आहेत.
जून २०२१
३ जून, ४ जून, ५ जून, १६ जून, १९ जून, २० जून, २२ जून, २३ जून आणि २४ जून असे नऊ मुहूर्त आहेत.
जुलै २०२१
१ जुलाई, २ जुलै, ७ जुलै, १३ जुलै, १५ जुलै असे पाच मुहूर्त आहेत.
ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर २०२१
या तीन महिन्यात विवाह मुहूर्त नाहीत.
नोव्हेंबर २०२१
१५ नोव्हेंबर, १६ नोव्हेंबर, २० नोव्हेंबर, २१ नोव्हेंबर, २८ नोव्हेंबर, २९ नोव्हेंबर, ३० नोव्हेंबर असे सात विवाह मुहूर्त आहेत.
डिसेंबर २०२१
१ डिसेंबर, २ डिसेंबर, ६ डिसेंबर, ७ डिसेंबर, ११ डिसेंबर, १३ डिसेंबर असे सहा मुहूर्त आहेत.
अशा पद्धतीने डिसेंबर २०२० ते डिसेंबर २०२१ एकूण ४८ विवाहमुहूर्त आहेत.
विवाह मुहूर्त बाबत विशेष टीप- गुरू व शुक्राचा अस्त जरी असला तरी ज्यावेळी गुरू किंवा शुक्राचा उदय असेल अशा जानेवारी २०२१ ते मार्च २०२१ तसेच ऑगस्ट २०२१ ते सप्टेंबर २०२१ या काळातील आपात्कालीन तसेच गौण काळातील विवाह मुहूर्त देखील अनेक पंचांगकर्त्यांनी पालकांच्या सोयीसाठी दिलेले आहेत. अशा मुहूर्ताचा वापरदेखील विवाहासाठी करता येऊ शकतो. त्यासाठी पंचांगकर्त्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
विवाह मुहूर्त आणि गुरु -शुक्र ग्रहांचा संबंध
गुरु म्हणजे विवाह कार्यामधील प्रमुख ग्रह आहे. विवाह कार्यातील प्रत्येक विधीला गुरूचा आशीर्वाद असणे गरजेचे असते. गुरु हा पिवळ्या रंगाचे प्रतिनिधित्व करतो. म्हणूनच लग्नापूर्वी पिवळ्या रंगाची हळद लावली जाते. वधू तसेच वरांकडे परस्परांची ज्येष्ठ मंडळी हळद घेऊन येतात व ती वधू-वरांना लावतात. त्याचपद्धतीने विवाहातील अक्षतांना देखील हळद व कुंकू लावले जाते. विवाहातील प्रत्येक विधीमध्ये गुरुचे प्रतिनिधीत्व करणारी हळद प्रामुख्याने वापरली जाते. विवाहाप्रसंगी गुरूचा आशिर्वाद लाभणे तसेच वधुवरांच्या कुंडलीतील गुरुबळ लाभणे हे प्रकारे दीर्घकाळ वैवाहिक आयुष्याचे द्योतक मानले जाते. त्याचप्रमाणे शुक्र हा ग्रह वैवाहिक सुखाचा कारक असल्याने विवाह प्रसंगी शुक्राचा आशीर्वाद लाभणे हे दीर्घकालिन वैवाहिक सुखाचे प्रतिक मानले जाते. म्हणून विवाह प्रसंगी गुरु व शुक्र या ग्रहांचा आशिर्वाद लाभणे महत्त्वाचे असते, असे पंडित दिनेश पंत यांनी सांगितले आहे.
आवाहन – नाशिक येथील वास्तू विश्व कार्यालयामध्ये १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत सायंकाळी पाच ते आठ कुंडली तसेच वास्तु प्लॅनसाठी मोफत मार्गदर्शन देण्यात येणार आहे. “विवाह करण्यास उपयुक्त शेकडो टिप्स” त्याचप्रमाणे “वास्तूतील शुभ ऊर्जेसाठी १०१ टिप्स” ही दोन पुस्तके कार्यालयात उपलब्ध आहेत. अपॉइंटमेंटसाठी. पंडित दिनेश पंत (व्हाट्सअप नंबर 9373913484) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वास्तू विश्व कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.