मनाली देवरे, नाशिक
…..
आयपीएलच्या या सिझनमधील किंग्ज इलेव्हन पंजाबची साडेसाती संपायला तयार नाही असे दिसते आहे. फारशा तुल्यबळ नसलेल्या सनरायझर्स हैदराबादने देखील गुरुवारी किंग्ज इलेव्हन पंजाबचा ६९ धावांनी मोठा पराभव केला. आपल्या सहाव्या सामन्यात पाचव्या पराभवाला सामोरे जाताना किंग्ज इलेव्हन संघाने आज संघात भरपूर बदल करून बघितले होते, परंतु हे बदल देखील त्यांच्या पथ्यावर पडले नाही.आज पंजाब संघाने मुजीब उर रहमान आणि अर्शदीप सिंह या नवीन खेळाडूंना संधी दिली होती. परंतु, या संधीचे सोने त्यांना करता आले नाही. २०१ धावांचा पाठलाग करताना मधल्या फळीत निकोलस पुरन याने अवघ्या ३७ चेंडूत तब्बल २०८ च्या स्ट्राईक रेटने ७७ धावा काढल्या. परंतु, त्याला दुसऱ्या बाजूकडून मदत मिळालीच नाही.आपल्या फिरकीवर फलंदाजाना नाचवणाऱ्या रशीद खानने फक्त १२ धावा देऊन ३ बळी घेतले. खलील अहमद आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी दोन बळी घेऊन किंग्ज इलेव्हन संघाचा कणा मोडला. टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेणाऱ्या सनरायझर्स हैद्राबादने २० षटकात २०१ धावांचे मजबूत आव्हान किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला दिले होते. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेरस्टो यांनी आज सर्वोत्कृष्ट मजबूत सलामी दिली. वॉर्नर ४० चेंडूत ५२ धावा तर शतक हुकलेल्या जॉनी बेरस्टोच्या अवघ्या ५५ धावात ९७ धावा सनरायझर्सच्या कामगिरीत आश्वासक ठरल्या.

शुक्रवारचा सामना
शुक्रवारी शारजाहच्या मैदानावर राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत होणार आहे. आपल्या कामगिरीत आतापर्यंत सातत्य राखत आलेला दिल्ली कॅपिटल्स, सततच्या पराभवाने जखमी असलेल्या राजस्थान रॉयल्सला कशी लढत देतो हे बघणे महत्त्वाचे ठरेल.