मुंबई – बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या कारचा चालक आणि स्टाफ मधील दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कारचालक अशोकला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होताच सलमान खान याने स्वतःला क्वॉरंटाईन केले आहे. त्यामुळे सलमान खान १४ दिवस विलगीकरण कक्षात असेल अशी माहिती पिंकविलाने दिली आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण खान कुटुंब सेल्फ आयसोलेशनमध्ये असणार आहे. कारचालक आणि स्टाफमधील दोन जणांवर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. सलमानचे वडील सलीम खान आणि आई सलमा खान यांच्या वेडिंग ऍनिव्हर्सरीची पार्टी रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.









