मुंबई – सलमान खानसोबतच्या आपल्या रिलेशनशीपबद्दल बोलत असल्याने सोमी अली सध्या फारच चर्चेत आहे. यातून अनेक गोष्टी समोर येत आहेत. पाकिस्तानी मॉडेल आणि अभिनेत्री सोमी अली बॉलीवूडमधीलही अनेक चित्रपटांमध्ये झळकली आहे. जेव्हा मी आणि सलमान खान एकत्र होतो, तेव्हाही तो मला फसवत असल्याचा आरोप सोमीने केला आहे.
२० वर्षांपूर्वी माझे त्याच्याशी ब्रेकअप झाले. त्याने मला धोका दिला. हे माझ्या लक्षात येताच मी त्याला सोडले आणि निघून गेले. हे सारं इतकं साधं सोपं सरळ आहे. झूमला दिलेल्या मुलाखतीत ती या सगळ्या गोष्टींचा उलगडा करते आहे. त्याच्यासोबतचे नाते, तिचे करिअर आणि अभिनयाच्या बाबतीतही अनेक गोष्टी तिने सांगितल्या आहेत.
सलमानने आपल्याला फसवल्याचा आरोप करण्याची सोमी अलीची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मिड डे ला दिलेल्या मुलाखतीतही तिने हा आरोप केला आहे. आपण भारतात केवळ सलमानशी लग्न करण्यासाठी आल्याचेही तिने म्हटले होते.









