मुंबई – शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांशी पंगा घेतल्यानंतर कंगणा रनौतला बॉलिवूडमध्ये अनेक संकटांचा आणि आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अलीकडेच तिने स्वतःच खुलासा केला आहे की जवळपास सर्व ब्रँड्सने तिचे कॉन्ट्रॅक्ट रद्द केले आहेत. तसेच कॉस्मेटिक क्रीमच्या जाहिराती आणि चित्रपटांतील आयटम नंबर करण्यासही आपण तयार नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे.
कंगना कायमच वादग्रस्त विधान करण्यासाठी चर्चेच असते. त्यावरून चतिला बरेच ट्रोल देखील केले जाते. ट्वीटरवर तर तिचे विरोधक ट्रोल करण्यासाठी तयारच असतात. तिने अलीकडेच केलेल्या ट्वीटमध्ये आपण संपूर्ण कमाई दान देत असल्याचे म्हटले आहे. त्यावरून विरोधकांनी तिची चांगलीच खेचली आहे. ती म्हणते, मी स्वतःचा मोठेपणा सांगत नाही. पण चेहरा गोरा करण्याचा दावा करणाऱ्या कॉस्मेटिक क्रीमच्या जाहिराती करण्याला माझा स्पष्ट नकार असतो.
तसेच मी कधीही चित्रपटात आयटम सॉंग करीत नाही आणि मोठ्या नटांच्या चित्रपटात कामही करीत नाही. आजपर्यंत मी तसे चित्रपटही केलेले नाहीत. तरीही मी जे काही कमावते ते चांगल्या कार्यासाठी दान रीत असते. लोकांनीही आपल्या कमाईचा एक हिस्सा चांगल्या कार्यासाठी द्यायला हवा, असा माझा आग्रह राहिला आहे. अलीकडेच कंगना ने आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहाना हिच्या शेतकरी आंदोलनावरील ट्वीटवर टिका केली होती. कंगनाने तिले मूर्ख असे संबोधले होते. रिहाना एक साधी गायिका आहे. तिच्यात काही विशेष नाही. फक्त नृत्य करताना ती अश्लील भाव चेहऱ्यावर आणते, एवढेच. बाकी तिच्यात काहीच नाही, असेही ती म्हणाली होती.