नवी दिल्ली – कोरोना निर्मुलनासाठी सुरू झालेल्या लसीकरणाला देशातील जनतेचा प्रतिसाद लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता सर्व खासगी रुग्णालयांनाही लसीकरणासाठी मुभा दिली आहे. त्यासाठी सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन खासगी रुग्णालयांना करावे लागेल.
नरेंद्र मोदी यांनी लस घेतल्यानंतर जनतेलाही आवाहन केले होते. त्यानंतर अवघ्या एक दिवसात पोर्टलवर 50 लाख लोकांनी नोंदणी केली. सध्या 60 वर्षांवरील नागरिक व 45 ते 60 वयोगटातील गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना लस दिली जात आहे.
आता यात सर्व खासगी रुग्णालयांना लसीकरण केंद्र म्हणून काम करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या, रुग्णालयातील जागा, उपचाराची व्यवस्था आदी बाबींचे निकष ठरवून देण्यात आले आहेत.
