नवी दिल्ली – भारतीय फोन निर्मात्या मायक्रोमॅक्सने गेल्या वर्षी दोन परवडणारे व स्वस्त स्मार्टफोन मायक्रोमॅक्स इन नोट १ आणि मायक्रोमॅक्स इन १ बीने बाजारात आणून अन्य कंपन्यांना जोरदार धडक दिली आहे. त्याचबरोबर, कंपनी आता आयएन मालिके अंतर्गत आणखी एक स्वस्त आणि स्वदेशी स्मार्टफोन बाजारात आणला आहे.
मायक्रोमॅक्स इन १
मायक्रोमॅक्स आयएन १ हा स्मार्ट फोन नुकताच लाँच झाला आहे. हा कमी किंमतीचा स्वदेशी स्मार्टफोन आहे. मायक्रोमॅक्स कंपनीने गेल्या वर्षी चिनी स्मार्टफोनशी स्पर्धा करण्यासाठी मायक्रोमॅक्स इन नोट १ आणि मायक्रोमॅक्स इन १ बी हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले होते.
या स्मार्टफोनचे वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे
मायक्रोमॅक्स ५ जी स्मार्टफोन
मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा यांनी सांगितले की, कंपनी ५ जी वर काम करत असून लवकरच बाजारात नवीन फोन आणणार आहे. तथापि, त्याचे नाव, तारीख किंवा वैशिष्ट्यांविषयी कोणतीही माहिती उघड झाली नाही. मात्र जर कंपनीने ५ जी फोन बाजारात आणला तर तो कमी किंमतीचा असेल.