नवी दिल्ली – सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड लसीला केंद्र सरकारने आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. ब्रिटन व अर्जेटिनानंतर ऑक्सफोर्ड लसीला मान्यता देणारा भारत हा तिसरा देश आहे. त्यामुळे भारतात आता कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. भारतवासियांना यामुळे नववर्ष भेट मिळाली आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटच्या प्लॅण्टमध्ये या लसीची निर्मिती केली जाते आहे. या प्रकल्पाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली होती.