नवी दिल्ली – भारतातील नागरिकांसाठी सर्वात मोठी बातमी आहे. कोरोनाची लस भारतीयांना चक्क फुकट उपलब्ध होणार आहे. या लसीसाठी भारतीयांना एक रुपयाही मोजावा लागणार नाही. तशी घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्र सरकारने कोविशिल्ड या कोरोना लसीला नुकतीच मंजुरी दिली आहे. आज देशभरात या लसीचा ड्राय रन (रंगीत तालिम) सुरू आहे. पुढील आठवड्यापासून देशात लसीकरण सुरू होण्याची चिन्हे आहेत. सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योद्ध्यांना ही लस दिली जाणार आहे.