मुंबई – सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांतर्फे कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधीत (कोविड 19) मदत देण्यात आली आहे. ३ लाख ३७ हजार २४० रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या मदतीच्या रुपाने स्वीय सहाय्यकांनी सामाजिक बांधिलकी जपत कोविड १९ विरुद्धच्या लढाईत योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या मदतीसाठी सर्वपक्षीय आमदारांच्या स्वीय सहाय्यकांना धन्यवाद दिले आहेत.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!