नवी दिल्ली – भारताचे पंतप्रधान आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची लवकरच भेट होणार आहे. भारत-चीन दरम्यानचा तणाव दूर करण्यासंदर्भात ही भेट महत्त्वाची ठरणार आहे. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत १७ नोव्हेंबर रोजी या दोन्ही नेत्यांची भेट होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, भारत आणि चीन यांच्यातील लष्करी अधिकाऱ्यांमधील चर्चेची फेरी येत्या १२ ऑक्टोबर रोजी होणार आहे.