मुंबई – ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागत असतानाच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सरपंचपद आरक्षणाबाबत मोठे विधान केले आहे. य़ापूर्वी सरकारने या आरक्षण सोडत जाहिर केली होती. मात्र, निवडणुकांमुळे या सोडतीला स्थगिती देण्यात आली होती. आता ही सोडत येत्या महिन्याभराच्या आत काढली जाणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. तसेच, बोगस दाखल्यांच्या प्रकारांनाही आता आळा बसला आहे, असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे.