मुंबई – शिवसेना खासदार व प्रवक्ते संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यात ग्रँड हयातमध्ये भेट झाल्यानंतर चर्चेचा उधान आले होेते. त्यावर फडणवीस यांनी माहित देत ही भेट राजकीय नसल्याचे सांगितले. महाविकास आघाडीचे सरकार हे त्यांच्या कृतीमुळेच पडेल, आम्हाला सरकार पाडण्याची घाई नाही. सरकार विरोधात लोकांमध्ये आक्रोश आहे. आम्ही विरोधी पक्ष म्हणून सरकाला धारेवर धरण्याचे काम करत आहोत. ते पुढेही सुरुच राहिल. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्याबरोबर सामनाच्या मुलाखती संदर्भात चर्चा झाली. त्यांनी अगोदर फोन केला होता. पण, त्याबाबत एकदा भेटू असे त्यांना मी सांगितले. नंतर ही भेट झाली. मुलाखती बाबत काही अटी होत्या, ती अनकट असावी, माझाही कॅमेरामन असेल असेही त्यांनी सांगितले.
वरवर या भेटीवर फडणवीस यांनी उत्तर दिले असले तरी ही भेट राजकीय असल्याचे बोलले जात आहे. त्याबाबत मात्र दोन्ही बाजूंनी स्पष्टपणे बोलले जात नाही. दुसरीकडे ही भेट झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व मुख्यमंत्री यांची भेट झाली आहे. त्यामुळे एकुण राज्याच्या राजकारणात कोरोना काळात चर्चेचा उधान आले आहे.