मुंबई – राज्य शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकारच्या शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांनी परिधान करायच्या पोशाखासंदर्भात मार्गदर्शक सूचना राज्य सरकारनं आज जारी केल्या आहेत. शासनाच्या नियमित तसेच कंत्राटी स्वरुपातील अधिकारी, कर्मचारी, सल्लागारांना या सूचना लागू राहतील.
शासकिय कार्यालयात काम करत असताना कर्मचाऱ्यांनी आपल्या वेशभूषेबद्दल जागरुक राहून दैनदिन पेहराव करावा, यासाठी या सूचना देण्यात आल्या आहे. शासकीय कार्यालयात अनेक खाजगी संस्थांचे प्रतिनिधी, उच्च प्रद्स्थ अधिकारी भेट देत असतात, अशा वेळी शासकीय कर्मचारी शासकीय प्रतिनिधी म्हणून संवाद साधतात त्यामुळे शासकीय कार्यालयाला अनुरुप राहील, याची सर्वकष काळजी घेणं, सरकारला अभिप्रेत आहे.
सर्व कर्मचाऱ्यांचा पेहराव स्वच्छ आणि नीटनेटका असवा, ओळखपत्र दर्शनी भागावर धारण करावं, आठवड्यातून किमान एकदा दर शुक्रवारी खादी कपड्याचा पेहराव परिधान करावा. गडद, चित्रविचित्र नक्षीकाम असलेले पोशाख परिधान करु नये, जीन्स आणि टि-शर्टचा वापर कार्यालयात करु नये, अशा सूचनांचा यात समावेश आहे.