मनमाड – मनमाड पासून १२ किमी अंतरावर असलेल्या समीट जवळच्या लोणच्या डोंगराला रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास आग लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळे वन्यजीव, पक्षांचे जीव धोक्यात आले. रात्री उशीरापर्यंत ही आग विझवण्याचे काम सुरु होते.येवला नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला याची माहिती मिळताच अग्निशामक घटनास्थळी पोहचले. त्यापाठोपाठ मनमाडची अग्निशामक पण घटनास्थळी पोहचले. डोंगराच्या पायथ्याशी असेलली आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले. पण, आग डोंगराच्या शेंडयापर्यंत पोहचल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.