नाशिक – समाज कल्याण कार्यालयात जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली असून त्यामुळे गोंधळ निर्माण झाला आहे. पडताळणी कार्यालयात अडवणूक होत असल्याची भावना विद्यार्थ्यांची झाल्यामुळे येथे विद्यार्थी संतप्त झाले आहे. प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्यास प्रवेशामध्ये अडचणी निर्माण होईल अशी भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे. या सर्व प्रकारात अधिकारी व कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याच्या विद्यार्थी व पालकांच्या तक्रारी आहे.










