दिंडोरी : दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या कृषिशास्त्र विभाग व कृषी विकास व संशोधन चॅरीटेबल ट्रस्ट आयोजित जागतिक कृषीमहोत्सवास शुक्रवार २२ पासून संपूर्ण महाराष्ट्र, परराज्य व परदेशात सुरवात झाली आहे. या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा दिंडोरी येथील मातोश्री शाकुंतालाताई कृषीभवन येथे दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली आण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते मातीचे पूजन करून संपन्न झाला. यावेळी पद्मश्री कल्पना सरोज खासदार हेमंत गोडसे, नगराध्यक्षा रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, नगरसेवक प्रमोद देशमुख, माधवराव साळुंके, दिलीप जाधव, गुलाब जाधव, सुनील आव्हाड, सतिष देशमुख, नरेंद्र जाधव, विदर्भातील व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. या वेळी दरवर्षीप्रमाणे वनारवाडी येथील शेतकरी जोडप्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमच्या सुरुवातीस कृषी ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
शेतकऱ्यांसाठी कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन घेऊन नवनवीन तंत्रज्ञानाने आजही लाखो लोकांना फायदा झाला असून आजचा तरुण शेतकरी आजही शेतीतकडे वळत आहे याचे श्रेय जागतिक कृषी महोत्सवास आहे. नदी जोड प्रकल्प वळण योजना व विज पिकेल ते विकेलं या साठी शासकीय जागा मिळाल्या तर शेतकरी थेट ग्राहकांना माल विकेल या साठी मुख्यमंत्री यांच्या सोबत चर्चा झाली आहे लवकरच यावर निर्णय होईल. शेतीसाठी काल, आज व उद्याही स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने सुरू असलेले जागतिक कृषिमहोत्सवाचे मोठे योगदान आहे असे उदगार खासदार हेमंत गोडसे यांनी या वेळी केले.
यावेळी गुरुमाऊली म्हणाले की, शेतीतील कृषितंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी आज एकाच वेळी अकराशे ठिकाणी हा उपक्रम सुरू होत आहे. जास्त गर्दी न करता व जनतेचे आरोग्याच्या दृष्टीने सरकारचे सर्व नियम पाळून याची सुरुवात केली आहे. साठी उलटलेली शेतकरी आजही शेती करतात मात्र तरुण फारसा याकडे वळत नाही मात्र या साठी स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने कृषी मेळावा घेतला जातो सत्संग घेतला जात नाही. देशी गाईच्या संगोपणा मुळे आत्महत्या थांबतात व गायीच्या पंचगव्यापासून स्नान केल्याने मनात चांगले विचार येऊन सकारात्मक ऊर्जा वाढते. कॅन्सर वर सप्तरंगी नावाच्या वनस्पती मुळे मात करता येते या वनस्पतीची लागवड त्र्यंबकेश्वर येथे केली आहे. रानभेंडी व वेखंडा मुळे गळ्याच्या व सर्वच प्रकारचा कॅन्सर बरा होते. गेल्या चाळीस पन्नास वर्षांपासून केंद्राच्या वतीने ग्रामाभियान सुरू करून सज्ञान व सुदृढ पिढी निर्माण करण्याचे कार्य सुरू आहे. स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने विविध विभागांच्या माध्यमातून समाजातील विविध समस्या निवारण करण्याचे कार्य अविरत सुरू आहे.
आज विवाह मंडळाकडे चाळीस हजार विवाहेच्छुक मुला-मुलींची ऑनलाईन नोंद आहे. प्रत्येकाने किमान एक गाय पाळावी, आज एकही शेतकऱ्यां कडे स्वतःचे बियाणे नाही हे वाईट आहे, शेतमाल भाव वाढले की लोकांच्या डोळ्यात खुपते यासाठी शाकंभरी बीज भांडार या उपक्रमातून ७०० पेक्षा जास्त देशी बियाण्यांचे संवर्धन व संकलन केले आहे.
जागतिक कृषी महोत्सवाचे आयोजक आबासाहेब मोरे यांनी आभारपर संवादात सांगितले की, गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेला हा कृषी मोहोत्सव आज जगभरात पोहचला असून गुरुवार पर्यंत किमान अकरा लाख शेतकरी यात जोडले जाणार आहे. हा कार्यक्रम जपान, नेपाळ, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, छत्तिसगढ, गुडगाव, हरियाणा, कर्नाटक व गोवा, महाराष्ट्रातील सर्व तालुका-जिल्हा निहाय विविध ठिकाणी गाव-पातळीवर कमी-अधिक संख्येने सुमारे ९०० पेक्षाही अधिक ठिकाणी होणार. यात कृषी विषयक तज्ञांचे “दिंडोरी प्रणीत सेवामार्ग” या युट्यूब चॅनेलद्वारा ऑनलाइन चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. शासन, विविध यंत्रणा व कोणत्याही व्यवस्थांवर अवलंबून ण राहता स्वावलंबी शेती पुढे आणणे हि काळाची गरज आहे. शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी दिंडोरी प्रणित फार्मर प्रोड्युसर कंपनीद्वारा सात्विक कृषिधन या ब्रँड अंतर्गत काम सुरू आहे. स्वावलंबी व शाश्वत शेती, जैव विविधता तयार झाल्या शिवाय पर्याय नाही या साठी स्वामी समर्थ केंद्राच्या माध्यमातून विनामूल्य जागतिक कृषी महोत्सवात सुरू आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी “कृषियोग” या सेंद्रिय खते-औषधांच्या ब्रँडचे लोकार्पण गुरुमाउली यांच्या हस्ते करण्यात आले. दिंडोरी येथील शेताच्या बांधावर विविध कृषी विषयक कंपन्यांचे स्टॉल उपलब्ध करण्यात आले होते.