कळवण –सप्तश्रृंग गडावर जाताना भवानी तलाव अलीकडील माकड पॉईंट दरीत १०० फूट दरीत ४५-५० वर्षीय पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली असून ही हत्या की आत्महत्या याबाबत चर्चा सुरु आहे.
भाविक तसेच गडावर जाणारे पर्यटक माकड पॉईंट परिसरात थांबून नैसर्गिक सौदर्याचा आनंद घेतात. फळ विक्रेते व इतर व्यावसायिक यांची छोटेखानी दुकानें थाटलेली असल्यामुळे व माकडांची रेलचेल असल्यामुळे पर्यटक व देवी भक्त या पॉईंटवर आवर्जून थांबतात. सकाळी परिसरात दुर्गंधीचा वास येतं असल्यामुळे दरीत पोलिसांनी व नागरिकांनी शोध घेतला असता पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला असून साधारण ४५-५० वर्षीय व्यक्ती असून मृतदेह कुजल्यामुळे परिसरात दुर्गंधीचा वास येत होता. चेहरा काळपट झाल्यामुळे ओळखू येत नसून गेल्या ५/६ दिवसापूर्वी मयत झालेला असावा असा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. १०० फूट दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आली असून अंगावर जखमा नसुन डोक्यास मोठी जखम आहे अंगात लाल रंगांचा रेडीमेड शर्ट व राखाडी रंगाची पॅन्ट आहे उजव्या हातावर देवता व त्रिशूळ गोंदवेले आहे उंची ५ फुट २ ते ३ इंच आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व योगेश गवळी, शिवा शिंदे व पोलीसानी धाव घेऊन पाहणी करुन पंचनामा केला. पोलीस कर्मचारी शिवा शिंदे, योगेश गवळी व सहकारीनी नागरिकांच्या मदतीने 100फूट दरीतून मृतदेह बाहेर काढला. सप्तश्रुंग गड परिसरात, डोंगर दरीकपारीत मृतदेह नेहमीच कुजलेल्या अवस्थेत आढळून येण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. आत्महत्या की हत्या याबाबत चर्चा सुरु असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण पोलीस करीत आहे.