नाशिक – शहर परिसरात चोरट्यांमी विवाह सोहळ्यांना लक्ष्य केल्याची बाब समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात विविध ठिकाणी सातत्याने घटना घडक असून गंगापूररोडवरील बालाजी लॉन्समध्येही सप्तपदीवेळी अडीच लाखांचे दागिने लंपास केले आहेत. त्यामुळे चोरट्यांनी एकप्रकारे पोलिसांनाच आव्हान दिल्याचे स्पष्ट होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितानुसार, योगिनी श्रीराम कातकाडे (रा. सप्तशृंगी कॉलनी, कुसुमाग्रज प्रतिष्ठान जवळ) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. कातकाडे गुरूवारी (दि.२४) नातेवाईकाच्या विवाहसोहळ्यानिमित्त बालाजी लॉन्स येथे गेल्या होत्या. विवाह पूर्वी वधू वरांचा सप्तपदी विधी सुरू असतांना ही घटना घडली. वधू वरांजवळ त्या स्टेजवर बसलेल्या असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांची पर्स चोरून नेली. या पर्स मध्ये दीड लाखाची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख ६६ हजार रूपये किमतीचा ऐवज होता. पोलीस लॉन्स मधील सीसीटिव्ही यंत्रणेच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेत असून अधिक तपास पोलीस नाईक भारत बोळे करीत आहेत. दरम्यान लॉकडाऊन नंतर कोवीड -१९ च्या नियमांच्या आधारे शहरात विवाह सोहळे पार पडत आहेत. मात्र तरीही अल्पसंख्येतील या सोहळ््यांमध्ये चोरीचे प्रमाण वाढले असून,महिनाभरात शहरातील ही तिसरी घटना आहे. एकुणच लॉन्स मध्ये होणाºया विवाह सोहळ््याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून भुरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वधू वर पक्षाकडून होवू लागली आहे.