बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सप्टेंबर पासून कोरोना कमी होण्याची शक्यता; या पद्मश्री डॉक्टरांनी दिली माहिती

by India Darpan
ऑगस्ट 12, 2020 | 8:36 am
in संमिश्र वार्ता
0
EbYFJ0dUwAAFSmo

नाशिक – साधारण ऐंशी वर्षांपूर्वी आलेल्या प्लेगच्या साथीनंतर संपूर्ण जगभरात आलेला करोना आजार अंगावर काढू नये, अन्यथा विशिष्ट तापाची लागण होऊन  हा आजार जीवावर बेततो असा इशारा राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी दिला. सप्टेंबर पासून राज्यात हा आजार कमी होण्याची शक्यता वर्तवणारी दिलासादायक बाब ही डॉ. लहाने यांनी ‘आरोग्य चिंतन’ फेसबुक लाईव्ह वेबिनार माध्यमातून नागरिकांशी संवाद साधताना सांगितली.
‘जनतेच्या आरोग्यासाठी सार्वजनिक आरोग्य सेवांची भूमिका’ या विषयावर डॉ. लहाने यांनी आरोग्य चिंतन वेबिनार व्याख्यानमालेत आपले विचार मांडले. ते म्हणाले की, कोणताही आजार अचानक आल्यानंतर शासन यंत्रणा प्रभावी पणे कशी कार्यरत होते ते आपण अनुभवत आहोत. लॉक डाऊन चा निश्चितच मोठा उपयोग झाला. यामुळे रुग्णांची संख्या आटोक्यात राहण्यास मदत झाल्याचे ते म्हणाले. राज्यात गेल्या दीड महिन्यांपूर्वी तीन करोना चाचणी करणाऱ्या  प्रयोगशाळा होत्या.  तीन वरून आता  ही संख्या १४४ प्रयोगशाळा पर्यंत करण्यात आली आहे. यापैकी राज्यात सध्या ७१ खाजगी प्रयोगशाळा असून उर्वरित सर्व शासकीय प्रयोगशाळांमध्ये करोनाची मोफत चाचणी केली जाते.
 सध्या करोना शहरी भागापासून ग्रामीण भागांमध्ये पाय पसरत असल्याबाबत त्यांनी नागरिकांना अधिक काळजी घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, नागरिकांनी आपला केवळ अधिकार आणि हक्क लक्षात ठेवू नये. कर्तव्य सुद्धा लक्षात ठेवावे. नागरिकांनी दैनंदिन व्यवहारात मास्क वापरलेच पाहिजेत. मुंबई सारख्या गर्दीच्या ठिकाणाहून करोना कमी होत असल्यामुळे शासनाची पावले सकारात्मक रित्या पडत असल्याचे त्यांनी सांगितले. सहकार क्षेत्रातील डोंबिवली नागरी बँकेने नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी नागरिकांच्या सोयीसाठी योजना तयार केली असून  याबाबत बँकेचे जेष्ठ अधिकारी उदय पेंडसे यांनी विशद केलेल्या माहितीवर डॉ लहाने यांनी अशा सुविधेचा  करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना चांगला उपयोग होऊ शकेल असे मत व्यक्त केले. आरोग्य चिंतनचे सल्लागार मिलिंद आरोलकर यांनी प्रास्ताविक आणि डॉ लहाने यांचा परिचय करून दिला तर संपादक वैद्य विजय कुलकर्णी यांनी आभार मानले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चांदवड – गुजरात गल्ली येथील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ

Next Post

‘मिशन झिरो’ मध्ये सापडले ३१०० कोरोना बाधित; आतापर्यंत २७ हजार चाचण्या

Next Post
IMG 20200811 WA0019

'मिशन झिरो' मध्ये सापडले ३१०० कोरोना बाधित; आतापर्यंत २७ हजार चाचण्या

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

IMG 20250618 WA0122 1 e1750225213219

ओझर मर्चंट बँकेचे विद्यमान चेअरमन राजेंद्र दत्तात्रय शिंदे यांचे संचालकपद रद्द

जून 18, 2025
Untitled 16

आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सद्वारे अ‍ॅप आणि वेबसाइटद्वारे बेकायदेशीर ट्रेडिंग…ईडीने मुंबई, दिल्लीसह ७ ठिकाणी केली मोठी कारवाई

जून 18, 2025
Untitled 50

पुणे, चंद्रपूर, नंदुरबारसह या जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह पदाधिका-यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

जून 18, 2025
cricket

या स्पर्धेत नाशिकच्या ईश्वरी सावकारला उत्कृष्ट फलंदाजीची ऑरेंज कॅप तर गोलंदाजीत प्रियंका घोडकेचीही चमक

जून 18, 2025
image003Y64Y

भारताच्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन…इतकी आहे लोडिंग क्षमता

जून 18, 2025
mantralya mudra

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या…मंत्रिमंडळ बैठकीत आढावा

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011