मनाली देवरे, नाशिक
…..
सनरायझर्स हैद्राबाद संघाने मुंबई इंडियन्सचा साखळीतील शेवटच्या सामन्यात १० गडी राखून पराभव केला आणि नेट रनरेटच्या आधारे प्ले ऑफचे स्थान पक्के केले. सनरायझर्सने हा विजय मिळविल्यामुळे हॉटेलमध्ये बसुन प्ले ऑफचे स्वप्न्ा बघणा–या कोलकाता नाईट रायडर्स संघाची निराशा झाली कारण त्यांचे आव्हान आता संपुष्टात आले आहे.
सनरायझर्स हैद्राबादसाठी या सामन्यात दोन उद्दीष्ट साध्य करण्याची जबाबदारी होती. मुंबई विरूध्द विजय मिळवून २ गुणांची कमाई करायची आणि हा विजय मिळवतांना स्वतःचा रनरेट देखील कोलकात्याच्या पुढे नेवून ठेवायचा. या सामन्यात सनरायझर्ससाठी सगळं काही त्यांच्या अपेक्षेप्रमाणे झाले. आधी त्यांनी टॉस जिंकला. मुंबई इंडीयन्सला १४९ या माफक धावसंख्येवर रोखलेही आणि मग फलंदाजी करतांना जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या १५० धावा षटकं राखून पुर्ण देखील केल्या.
मुंबई संघ फलंदाजी करीत असतांना लक्षात राहीला ता कायरन पोलार्ड. शारजातली खेळपट्टी कोरडीठाक असल्याने चेंडून बॅटवर येत नव्हता आणि त्यामुळे मोठे फटके बघायला मिळत नव्हते. परंतु, पॉवरहाउस पोलार्डने आपली ताकद या खेळपट्टीवर वापरली आणि अवघ्या २५ चेंडून ४१ धावा केल्या. त्यात त्याने मारलेले ४ षटकार आणि २ चौकार लाजवाब होते. सुर्यकुमार यादव (३६) आणि इशान किशन (३३) यांनी सुरूवातीला केलेल्या फटकेबाजीमुळे मुंबईला किमान १४९ धावांची मजल गाठता आली. सनरायझर्स तर्फे संदीप शर्मा, जेसन होल्डर आणि नदीमने सुरेख गोलंदाजीचे प्रदर्शन केले. सनरायझर्स तर्फे सलामीवीर डेव्हीड वॉर्नर (८५ नाबाद) आणि वूध्दीमान साहा (५८ नाबाद) या दोघांनीच विजयासाठी आवश्यक असलेले लक्ष्य पुर्ण करतांना मुंबई इंडीयन्सचा १० गडी राखून पराभव केला.
मुंबई इंडीयन्ससाठी या सामन्यात जय पराजयापेक्षाही सर्वात महत्वाची न्युज होती ती म्हणजे कर्णधार रोहीत शर्माचे दुखापतीनंतर झालेले आगमन. त्याची दुखापत हा सध्या चर्चेचा विषय आहे. त्याच्या दुखापतीच्या गंभीरतेची शहानिशा न करताच ऑस्ट्रेलिया दौ–यासाठी निवड समितीने त्याला या दौ–यासाठी वगळलं आहे. रोहीत शर्मा आयपीएलच्या अंतीम टप्यात देखील खेळू शकणार नाही अशी चिंता निर्माण करणारा समज मुंबई इंडीयन्सच्या फॅन्स मध्ये यामुळे निर्माण झाला होता. परंतु, हा समज आता दूर झाला आहे. त्याने संपूर्ण सामन्यात मैदानावर उपस्थित राहून रोहीत शर्मा फीट आहे याचा दाखला दिला. मुंबई इंडीयन्ससाठी यापेक्षा वेगळी आनंदाची बाब काय असु शकेलॽ
सनरायझर्ससाठी हा मुकाबला खडतर होता. परंतु, लागोपाठ ३ सामने जिंकून हैद्राबादने हे स्थान गाठले असल्याने आता एलीमीनेटर सामन्यात रॉयल चॅलंजर्सशी होणारी त्यांची लढाई रोमाचंक होण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आयपीएल २०२० चा पहिला आणि मोठा टप्पा आज संपला. आयपीएलच्या प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी कमीत कमी १२ गुण मिळाले तरी पुरेशे ठरतात. परंतु, या सिझनच्या लढती इतक्या स्पर्धात्मक ठरल्या की सहभागी होणा–या सर्व ८ संघांनी १२ गुण मिळवल्याने अगदी शेवटच्या सामन्यापर्यन्त प्ले ऑफमधील प्रवेशाची रंगत टिकून राहीली. आता प्ले ऑफचे सामने खेळले जातील.
प्ले ऑफ फेरीचे टाईम टेबल पुढीलप्रमाणे आहे –
क्वालिफायर सामना क्र.१
मुंबई इंडीयन्स वि. दिल्ली कॅपीटल्स दि.५ नोव्हेंबर २०२० रोजी दुबईत.
एलिमीनेटर
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर वि सनरायझर्स हैद्राबाद/कोलकाता नाईट रायडर्स दि.६ नोव्हेंबर २०२० रोजी अबुधाबीत.
क्वालिफायर सामना क्र.२ एलिमीनेटर सामन्यातील विजेता संघ विरूध्द
क्वालिफायर सामना क्र.१ यातील पराभूत संघ.
दि.८ नोव्हेंबर २०२० रोजी दुबईत.
अंतिम सामना
क्वालिफायर सामना क्र.१ यातील विजेता संघ विरूध्द
क्वालिफायर सामना क्र.२ यातील विजेता संघ
दि.१० नोव्हेंबर २०२० रोजी अबुधाबीत.