नाशिक – कधी नव्हे ते नाशिक महापालिकेत सत्ता मिळाली असली तरी सुद्धा विकासासाठी काय कामे करावीत हेच उमजत नसल्याने नाशिक शहरासह प्रत्येक प्रभागाचा विकास खोळंबळा आहे. सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे प्रत्येक प्रभागात नागरी समस्या वाढत असल्याची खंत शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी व्यक्त केली. नाशिकरोड विभागातील प्रभाग क्र.१७, २० व २१ या प्रभागात झालेल्या बैठकीवेळी ते बोलत होते. यावेळी जेष्ठ पदाधिकारी निवृत्ती अरिंगळे, रामू जाधव, विद्यार्थी शहराध्यक्ष गौरव गोवर्धने, धनंजय निकाळे, डॉ.अमोल वाजे, संजय खैरनार, कैलास बनकर, धनंजय रहाणे, बाळासाहेब मते, विभाग अध्यक्ष मनोहर कोरडे, प्रशांत वाघ, नगरसेवक जगदीश पवार, माजी नगरसेवक शैलेश ढगे, हरीश भडांगे, वैशाली दाणी, विधानसभा अध्यक्षा सुरेखा निमसे, रुपाली पठाडे, बाळासाहेब जाधव, डॉ.युवराज मुठाळ, संजय पगारे, इम्रान शेख, विशाल घाडगे, नियामत शेख आदि उपस्थित होते.
नाशिक शहरातील विकास कामे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे होत नसून नाशिक शहरासह प्रभागांचा विकास खुंटला आहे. कधी नव्हे तो नगरसेवकांचा मान मिळत असल्याने सत्ताधाऱ्यांनी तो मिरवण्यातच ४ वर्षे घालविली असल्याने अनेक कामे रखडली गेली असल्याची खंत शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी बैठकीत व्यक्त केली. भाजपा नगरसेवकांनी प्रभागात कामे केली असती तर जेष्ठ नागरिकांनी या बैठकी समस्या मांडल्या नसत्या. बचत गटातील महिलांना त्यांचे उत्पादन विकण्याकरिता मंच उभारण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गोवर्धन येथे कलाग्राम उभारले. परंतु भाजपाच्या संकुचित वृत्ती मुळे ते सुरु होऊ शकले नाही. त्याच बरोबर गंगापूर धरणातला बोट क्लब प्रकल्प मुद्दामून दुर्लक्षित ठेवला गेला. त्यातील बोटी इतरत्र पळविल्या गेल्या. त्यामुळे पर्यटकांच्या माध्यमातून नाशिककरांना मिळणारा रोजगार बुडला. वैश्विक महामारी कोरोनाच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून गरजूंना अन्न धान्य सह इतर मदतीकरिता हात पुढे केला. हे सर्व जनता बघत असून मतदानाच्या स्वरुपात हे सर्व बाहेर येणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. प्रभागात कामांच्या नावाखाली रस्ते खोदण्यात आले परंतु ते बुजविले न गेल्याने अपघात होत असल्याची तक्रार जेष्ठ नागरिकांनी केली. तर बचत गटाला त्यांचे उत्पादन विक्रीकरिता व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची मागणी महिलांनी केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत स्थानिक महिलांनी प्रवेश केला.याप्रसंगी चंद्रकांत साडे, अशोक मोगल-पाटील, वंदना चाळीसगांवकर, भाईजान बाटलीवाला, विनोद गांगुर्डे, मुन्ना अन्सारी, गौतम पगारे, रमेश औटे, सोनू वायकर, तुषार दोंदे, शिवराज ओबेरॉय, राहुल तुपे, योगेश निसाळ, गिरीश मुदलियार, वसिम शेख, पुष्पलता उदावंत, अपर्णा जाधव, प्रमिला चव्हाण, निर्मला गांगुर्डे, दुर्गा कल्याणी, खुशबू गोहेर, छाया गायकवाड, भगवान थोरात, अमोल अरिंगळे, सागर शिंदे, चैतन्य देशमुख, अजहर शेख, जाकीर शेख, प्रमोद रिपोटे, सौरभ पवार, राजाभाऊ पवार, सुनिल महाले, संजय बोडके, शानू निकम, रमेश पगार, अनिल घोलप, बाबासाहेब अस्वले, सचिन भालेराव, दिपक बोराडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.