सटाणा – केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात तालुक्यातील काही शेतऱ्यांनी थेट तहसील कार्यालयाच्या प्रांगणातील जलकुंभावर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. शासनाच्या मका आधारभूत किंमत योजनेअंतर्गत तालुक्यातील ३७ शेतकर्यांचे ३६७७ क्विंटल मका खरेदीचे ६४ लाख ७१ हजार ५२० रुपये थकीत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून हे पैसे मिळालेले नाही. वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने संतप्त शेतकर्यांनी हे आंदोलन केले. आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुभाष अहिरे, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश काकुळते, शंकर नेरकर, दिलीप सोनवणे, पराग सुर्यवंशी, काळू काकुळते, शांताराम काकुळते, महारू बिरारी, तरूण गुंजाळ आदी सहभागी झाले. त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणा दिल्तया आणि अनेकांचे लक्ष वेधून घेतले.