निलेश गौतम
डांगसौंदाणे – कोरोना काळात ठप्प झालेली विकासकामे यातच सिमेंट लोखंडाचे वाढते दर ,यामुळे शासकीय ठेकेदारांच्या समस्येत वाढ झालेली आहे. सिमेंट व लोखंडाचे दर कमी करून पुरवठादार कंपनीवर शासनाने बंधने आणत दर नियंत्रणात आणण्यासाठी आज बागलाण तालुका शासकीय ठेकेदार संघटनेच्या वतीने तहसीलदार जितेंद्र इंगळे -पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.
एकीकडे शासनाच्या वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना तर दुसरीकडे बांधकाम साहित्याचे वाढते दर यामुळे ठेकेदारांना हे कामे करतांना घरातून पैसे टाकण्याची वेळ आली आहे. जुन्या शासकीय दराने कामे घेतल्याने आणि संस्था एजंटशी यांनी कामे पूर्ण करण्याचा करारनामा करून दिल्याने ही कामे वेळेत पूर्ण करावी लागणार आहेत. कोरोना काळात सगळीच कामे ठप्प झाली होती कामे सुरु करताच लोखंड कंपनी व सिमेंट उत्पादक कंपनीने आपल्या पद्धतीने रोजच भाववाढ करून ठेकेदारांचे आर्थिक शोषण करण्यास सुरुवात केली आहे. या कंपण्यावर सरकारचे कुठले ही निर्बंध नसल्याने रोजच या कंपन्यांची मनमानी थांबावी यासाठी हे निवेदन देण्यात आले. या निवेदनावर ठेकेदार रवींद्र आहिरे, राहुल भदाणे ,निखिल आहिरे, संजय वाघ, निलेश अमृतकार, मनीष आहिरे, मयूर पाटील, अमित बधान ,स्वप्नील विरगावकर, दीपक आहिरे ,अरुण भामरे, दत्तू बैताडे, माणिक आहिरे ,अरुण भामरे, वसंत मुंडावरे, नाना मोरकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.