नाशिक – विदर्भ, मराठवाडा पाठोपाठ नाशिक जिल्ह्यात आज जोरदार वादळी वारा,पावसाने धडक दिली. तर सटाणा तालुक्यातील आदिवासी बहुल असलेल्या अंतापूर,तरहाबाद,पिंगळवडे या भागात संध्याकाळच्या सुमारास गारपीट पडल्या. अचानक झालेल्या या अवकाळी पावसाने गहू, हरभरा, आणि कांद्याचे नुकसान होण्याची शक्यता शेतक-यांनी व्यक्त केली. बेमोसमी पावासाचे थैमान अजूनही चालुच आहे. थंडीचे दिवस असतांना या पावसाने जोरदार हजेरी लावत गारांची बरसात केली. त्यामुळे सर्वांची धावपळही उडाली. या पावसामुळे मात्र शेतक-यांची चिंता वाढली आहे.
डांगसौंदाणे परीसरात गारपीट
डांगसौंदाणे परीसरात आज सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसासह गारपीट झाली कांदा पीक व इतर पिकांना या गारपिटीचा फटका बसणार आहे.
……
जिल्ह्यात मध्यम तुरळक पाऊस
नाशिक जिल्ह्यात काही तालुक्यात मध्यम तुरळक पाऊस सुरू आहे , बागलाण तालुक्यात काही ठिकाणी गारपिट झालेले आहे. कुठलीही जीवित हानी नाही. शेतीपीक नुकसानीबाबतचा अहवाल प्राप्त होताच पाठवणेत येईल.
सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक