सटाणा – येथील ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक व भाषा, कला, लोकजीवन, लोकसंस्कृती यांचे अभ्यासक डॉ. सुधीर रा. देवरे यांचा ‘ब्लॉगच्या जाळ्यातून जग’ हा लेखसंग्रह नुकताच पुण्याच्या ‘दिलीपराज प्रकाशना’तर्फे प्रसिध्द झाला. या ग्रंथासह डॉ. सुधीर देवरे यांची आतापर्यंत सतरा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
२०१२ पासून ब्लॉगवर लिहिलेल्या एकूण आठ वर्षांतील लेखांपैकी पहिल्या चार वर्षांतील निवडक लेखांचं पुस्तक म्हणजे हा ग्रंथ. पुस्तकात एकशे एकोणावीस लेख समाविष्ट आहेत. पुस्तकातील सर्व छोटेखानी लेखांत साहित्यिक, सांस्कृतिक, भाषिक, कला, लोकजीवन, सामाजिक, वैश्विक, धर्मकारण, राजकारण, समाजकारण,सत्ताकारण, शैक्षणिक, प्रबोधनात्मक, पर्यावरण, साहित्य, लोकसंस्कृती, दहशती, शेती, चरित्र, व्यक्तीविशेष, बोलीभाषा, अहिराणी भाषा आदी विविध वैचारिक पडसादांचं स्वतंत्र लेखन अंतर्भूत आहे.
‘डंख व्यालेलं अवकाश’, ‘आदिम तालनं संगीत’, ‘कला आणि संस्कृती: एक समन्वय’, ‘पंख गळून गेले तरी’, ‘अहिराणी लोकपरंपरा’, ‘अहिराणी गोत’, ‘अहिराणी वट्टा’, अहिराणी लोकसंस्कृती’, ‘अहिराणीच्या निमित्ताने: भाषा’, ‘माणूस जेव्हा देव होतो’, ‘सहज उडत राहिलो’, ‘सांस्कृतिक भारत’, ‘माणसं मरायची रांग’, ‘मी गोष्टीत मावत नाही’, ‘टिंब’, ‘आस्वाद: भावलेल्या कवितांचा’ ही डॉ. सुधीर देवरे यांची या आधीची ग्रंथसंपदा आहे.
आतापर्यंत डॉ. देवरे यांच्या कोणत्याच पुस्तकाचे प्रकाशन ठरवून समारंभपूर्वक औपचारिक पध्दतीने झालेले नाही. तीच परंपरा पाळत पुण्याच्या ‘दिलीपराज प्रकाशना’च्या कार्यालयात या पुस्तकाचे नुकतेच अनौपचारिकरित्या प्रकाशन करण्यात आले.
डॉ.सुधीर देवरे यांचे हार्दिक अभिनंदन!
congratulations Sir
लेखकाचे मन:पूर्वक अभिनंदन.
बदलत्या काळानुसार Kindle मध्ये पुस्तके संग्रही ठेवणे, वाहून नेणे, वाचणे अधिक सोयीचे झाले आहे. त्या दृष्टीने लेखकाचे हे पुस्तक किंवा इतर पुस्तके Amazon वर ई-बुक स्वरुपात उपलब्ध आहेत किंवा होतील का?